अमळनेर : मांडळ येथे शेतातून वाळू वाहतुकीस विरोध आणि तरुणाचा खून या घटनांनी वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेनंतर अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, वरवर शांत असलेल्या मांडळमध्ये अद्याप वाद क्षमलेला नसल्याचे चित्र आहे.
त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामस्थांसह महसूल व पोलिस दलानेही मांडळचा प्रश्न काळजीपूर्वक व डोळ्यात तेल घालून सोडवणे आवश्यक आहे. (Sand smugglers need to be put on stand Locals should also take initiative along administration Jalgaon News)
वाळूच्या वादातून यापूर्वीही गावातील दोन गटांमध्ये टोळी युद्ध उफाळून आले होते. अवैधरित्या होत असलेल्या वाळू वाहतुकीमुळे शेतीचे नुकसान होत असल्यामुळे आळा घालणाऱ्या जयवंत कोळी या तरुणाचा खून करण्यात आल्याचा आरोप असून, यापूर्वी म्हणजे साधारण दीड वर्षांपूर्वी जयवंत यांच्या चुलत बंधूवर असाच प्राणघातक हल्ला चढविण्यात आल्याचे आता चर्चिले जात आहे.
वाळू तस्कर, मुजोरांवर कायद्याचा वचक बसणार नसेल, महसूल वाळू उत्खन्नन व वाहतूक थांबणार नसेल तर दहशतीत असलेल्या ग्रामस्थांच्या भावनेचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत.
दरम्यान, या घटनेने केवळ मांडळ गावच नाही तरी संपूर्ण जिल्हा हादरला आहे. समाजमन ढवळून निघाले असून मुजोर वाळू तस्करांविरूद्ध रोष उफाळला आहे. म्हणूनच अशांवर आता थेट मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशित केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानंतर स्थानिक महसूल प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
शांततेसाठी पर्याय काढणे आवश्यक
सर्वधर्मियांना सर्व सांसारिक बंधनांपासून मुक्ती देणारे, त्यांच्या जीवनात सफलता आणि समृद्धी आणणारे जैन धर्माचे आठवे तीर्थकार श्री चंद्रप्रभु भगवान यांचे क्षेत्र असलेले मांडळ गाव नुकत्याच झालेल्या खुनाने राज्यभर गाजत आहे. वाळूतून एका नागरिकाचा बळी गेल्याने गाव तसं चांगलं पण वेशीला टांगलं अशी कुप्रसिद्धी गावाच्या माथी मारली गेली आहे. ‘अहिंसा परमो धर्म’ ही शिकवण देणाऱ्या जैन धर्माचे आठवे तीर्थकार चंद्रप्रभु यांच्या ‘अतिशय’ क्षेत्र मांडळ येथे सामंज्यस्यातून शांतता नांदावी म्हणून स्थानिकांनी पर्याय काढणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.