sand thieves frauding Maharashtra and Gujarat government jalgaon news esakal
जळगाव

Sakal Exclusive : वाळूमाफियांचे ‘नेटवर्क लय भारी’! वाळूचोरांचा महाराष्ट्रासह गुजरात सरकारलाही चुना

सकाळ वृत्तसेवा

Sakal Exclusive : शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून वाळूचा डंपर पकडला होता. वाळू डंपर पोलिसांनी थांबवताच अवघ्या पाच मिनिटांतच चक्क गुजरात राज्यातील पावती दाखविण्यात आली.

पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यावर ती पावती डंपर पकडल्यानंतर पाच मिनिटांनी जनरेट झाल्याचे निदर्शनास आल्यावरून गुन्हा दाखल असून, सहा महिन्यांनी संशयितास अटक करण्यात आली आहे. (sand thieves frauding Maharashtra and Gujarat government jalgaon news)

प्राप्त माहितीनुसार, २५ मार्चला शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने त्यांच्या हद्दीत वाळूचा एक डंपर थांबविला. चालकाला पावती मागितल्यावर त्याने मालकाला फोन लावला. मालकही तत्पर... त्याने अवघ्या दहा मिनिटांत पावती आणून पोलिस अधिकाऱ्याच्या हातात टेकवली. पावती बघितल्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी वाहन सोडणे अपेक्षित होते.

मात्र, पावतीवरची वेळ आणि वाहन पकडल्याच्या वेळेत अवघ्या पाच मिनिटांचे अंतर असल्याने पोलिस अधिकाऱ्यांचा संशय बळावला. तत्काळ त्यांनी जळगाव तहसीलदारांनाच चौकशीसाठी पाचारण करून वाहन, पावती त्यांच्या ताब्यात दिली.

चौकशीअंति २७ मार्चला तलाठी नीतेश गोविंद ब्यावळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात सचिन देवराम नन्नवरे (वय ३१, रा. बांभोरी), विकास गुलाब सोनवणे (वय ३०, रा. शनिपेठ) यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक निरीक्षक रवींद्र बागूल गुन्हे शोध पथकासह तपास करत आहेत.

पाच मिनिटांत सहाशे किलोमीटर

महसूल व पोलिस चौकशीत आढळून आल्यानुसार, जळगाव शहरात ज्या ठिकाणी वाळूचे वाहन पकडले गेले, तेथून गुजरात राज्यातील भरूच हे शहर तब्बल ६२३ किलोमीटर दूर आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पोलिसांनी सकाळी ७.५५ ला वाळू डंपर पकडले असताना दहा-१५ मिनिटांत संबंधित डंपरमालकाने सादर केलेली पावती ७.५० मिनिटांनी ऑनलाइन जनरेट (तयार) झाल्याचे निष्पन्न झाले.

अर्थात ज्या ठिकाणी पावती तयार करण्यात आली, ते ठिकाण जवळच असावे. असे असताना सहाशे किलोमीटर दूरवरची पावती उडतउडत पाच मिनिटांत पोचली. अर्थात्च महाराष्ट्र महसूल यंत्रणेसह गुजरात राज्यातील वाळूमाफियांशी संगनमत करून त्या सरकारची फसवणूक केली जात आहे.

सहा महिन्यांनंतर शरण

सचिन देवराम नन्नवरे, विकास गुलाब सोनवणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर व जिल्‍हा न्यायालयाने, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर नाइलाजास्तव संशयितांनी शरणागती पत्करली. अटकेनंतर सहाय्यक निरीक्षक राजेंद्र बागूल यांनी संशयिताला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य पाहता पाच दिवस पोलिस कोठडीत रवाना केले आहे.

पावतीचे जन्मस्थान

शासनाच्या गौणखनिज धोरणानुसार जीपीआरएस सुसज्ज वाहनातून वाहतूक करताना संबंधित वाळू, मुरूम, दगड, माती यांचा रीतसर पास परवाना असणे अपेक्षित आहे. पकडलेले वाहन जर भरूच (गुजरात) येथून सहाशे किलोमीटर दूर पकडला जातोय अन्‌ पाच मिनिटांच्या फरकाने पावती जनरेट होत असेल, तर अशा पावत्या जळगावच्याच वाळूमाफियांकडून तयार करवल्या जात असून, तो अड्डा शोधणे आता पोलिस व महसूल विभागासाठी जिकिरीचे काम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT