Satyajeet Tambe  esakal
जळगाव

Satyajeet Tambe | मी आता अपक्षच राहणार : आमदार सत्यजित तांबे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शंभर वर्षांपासून आमचे घराणे कॉंग्रेसमध्ये आहे. त्यामुळे सध्या कॉंग्रेसमध्ये सुरू असलेला वाद दुर्दैवी आहे. मी अपक्ष आमदार आहे. आमच्या घराण्याच्या राजकीय संबंधामुळे निवडणुकीत भाजपनेही मदत केली असणार. (satyajeet tambe statement about entering political party jalgaon news)

मला सर्वच पक्षांची मदत झाली आहे. त्यामुळे आगामी काळात मी भाजप किंवा कॉंग्रेसमध्येही जाणार नाही. मी अपक्षच राहणार आहे, असे मत नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी येथे व्यक्त केले.

निकालानंतर आमदार सत्यजित तांबे प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले. शुक्रवारी त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. येथील विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, की मी भाजपचा पाठिंबा मागितला नव्हता.

त्यांनीही दिला नव्हता. मात्र, त्यांनी निवडणुकीत मला साथ दिल्याची शक्यता आहे. कारण आमचे घराणे अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. त्यामुळे आमचे सर्वच पक्षातील लोकांशी चांगले संबंध आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

कॉंग्रेसने आपले निलंबन मागे घेतले, तर आपण कॉंग्रेसमध्ये कार्य करणार का? या प्रश्‍नाला उत्तर देताना आमदार तांबे म्हणाले, की ‘जर असे झाले, तर तसे झाले तर काय’, अशा प्रश्‍नांना आपण उत्तर देत नाही. आपण अपक्ष म्हणून निवडून आलो आहोत. जनतेने आपल्याला अपक्ष म्हणून मतदान केले आहे. त्यामुळे आता आपण अपक्षच राहणार आहोत. भाजप किंवा कॉंग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्‍नच नाही.

पाच जिल्ह्यांत युवक कल्याण कार्यालय

युवकांच्या प्रश्‍नाबाबत ते म्हणाले, की क्रीडा व युवक कल्याण केंद्राचे जिल्हा क्रीडाधिकारी प्रमुख असतात. मात्र, त्या ठिकाणी केवळ क्रीडा क्षेत्राकडे लक्ष दिले जाते. त्यामुळे आपण युवकांचे उच्च व व्यवसायिक शिक्षण, तसेच नोकरीच्या मार्गदर्शनाचे प्रश्‍न सोडविण्यसाठी उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत युवक कल्याण कार्यालय उघडण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

जिल्हाधिकाऱ्यांकडे आपण त्यासाठी जागेची मागणी करणार आहोत. त्या कार्यालयात युवकांना रोजगारांच्या कुठे व कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याचे मार्गदर्शन मिळेल. त्यासाठी तज्ज्ञ अधिकारी मार्गदर्शनासाठी उपस्थित राहतील.

उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत हा आपला पहिला प्रयत्न असेल. हा प्रयत्न यशस्वी झाला, तर हाच ‘पॅटर्न’ संपूर्ण राज्यात राबवून प्रत्येक ठिकाणी युवक कल्याण कार्यालय सुरू करण्यात येईल.

जुन्या पेन्शन योजनेसाठी अभ्यास दौरा

राज्यातील जुन्या पेन्शन योजनेबाबत आमदार तांबे म्हणाले, की राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश या राज्यांत पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण एक शिष्टमंडळ त्या राज्यात घेऊन जाणार आहोत. त्याचा अभ्यास करून त्याप्रमाणे महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपला प्रयत्न राहील.

छोटू खडके, सुनील गरुड आदी या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT