जळगाव : बांभोरीजवळ गिरणा नदीवरील पुलावरून उडी घेणाऱ्या तरुणाला कवेत घेत पोलिस कर्मचाऱ्याने बाजूला केले. क्षणाचा विलंब झाला असता, तर दोनशे फुटावरून खाली पडल्याने क्षणार्थात तरुणाचा मृत्यू झाला असता. मात्र, ड्यूटीवरून घरी येणारे पोलिस कर्मचारी घनश्याम पवार यांनी त्याचा नुसता जीवच वाचविला नाही, तर समजूत घालून त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले.
आवश्य वाचा- भयंकर दुर्घटना: मॅार्निंग वॅाकला दोघी निघाल्या आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच ठार झाल्या
पोलिस कर्मचारी धनःश्याम पवार पाळधी नाक्यावरून रात्री आठला ड्यूटी संपल्याने दुचाकीवरून घराकडे निघाले होते. बांभोरीजवळील गिरणा नदीच्या पुलावर रात्री ३० वर्षीय तरुण पुलाच्या कठड्यावर उभा राहून स्वतःला झोकून देण्याच्या तयारीत हेाता. क्षणाचाही विलंब न करता घनश्याम यांनी त्या तरुणाच्या कंबरेत हात घालत बाजूला ओढले. नंतर त्याची चौकशी केल्यावर रणजित सूर्यवंशी (रा. जैनाबाद, जळगाव) असे त्याने नाव सांगितले. त्याच्याशी गप्पा मारून आत्महत्त्येचे कारणही विचारले आणि त्याची समजूत घालून कुटुंबियांना बोलाविले. काही वेळातच तरुणाचे नातेवाइकांसह काका-काकू आले. घडला प्रकार कळाल्यावर आईला रडू कोसळले. वयोवृद्ध आईवडिलांनी जीव वाचवणाऱ्या पोलिसाचे आभार मानले.
डोक्यावर झाले कर्ज
आपल्यावर कर्ज झाले असून, हातउसनवारीसह बँकाकडून घेतलेल्या कर्जासाठी पैसे मागणारे पिच्छा पुरवत असल्याने आपण बेजार झाल्याचे रणजित सूर्यवंशी याने सांगितले.
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.