जळगाव

Jalgaon Crime News : शाळकरी गँगकडून कोयत्याने हल्ला; बहिणीशी प्रेमसंबधाच्या संशयातून अपहरण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील इंद्रप्रस्थनगरात खासगी क्लाससाठी येत असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याचे रिक्षातून अपहरण करुन नेत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.

प्रेम प्रकरणाच्या संशयावरून मुलीच्या नात्यातील तरुण व त्याच्या शाळकरी सवंगड्यांनी संबंधीत विद्यार्थ्यावर कोयत्याने वार करत जखमी केले. (school gang attack on student jalgaon crime news)

अव्हाणे (ता. जळगाव) येथील सुमेध सुरेश सपकाळे (वय १५) हा विद्यार्थी गावातीलच स्वामी समर्थ विद्यालयात इयत्ता दहावीचे शिक्षण घेत आहे. त्याने जळगावला इंद्रप्रस्थनगरात खासगी क्लासमध्येही प्रवेश घेतलेला आहे.

त्यासाठी तो गेल्या ४-५ महिन्यांपासुन अव्हाणे ते जळगाव असा प्रवास करुन क्लासला उपस्थित राहतो. त्याच्याच वर्गात शिक्षण घेणारा सुनील एकशिंगे याच्या नातेवाईक मुलीसोबत सुमेधचे प्रेम संबध असल्याचा संशय होता. बुधवारी (ता. ४) सकाळी सुमेध सपकाळे हा क्लास संपल्यावर घरी जाण्यासाठी निघाला होता.

त्यावेळी शंभर फुटी रोडवर एका ऑटो रिक्षातून आलेल्या विजय शिंदे याने सुमेधला जबरदस्ती रिक्षात बसवुन सागरमल शाळेच्या मागील बाजुस नेले.

तेथे रोहित केशव लचकर, गौरव विलास गायकवाड, यश दिपक जाधव, रिषभ दिपक तेजी, प्रथमेश सुनील एकशिंगे या टोळक्याने लाथाबुक्यांनी तुंबळ हाणामारी केले. तसेच, रोहित याने त्याच्याजवळील धारदार कोयत्याने हल्ला करून सुमेधच्या कोपरावर गंभीर दुखापत केली.

उपचारानंतर तक्रार..

सुमेध सपकाळे याला मारहाण होत असताना यश दिनेश अंबुरे याने सुमेधची सुटका करुन घरी सोडले. रक्तबंबाळ अवस्थेत सुमेधला त्यानंतर जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार पूर्ण झाल्यानंतर गुरूवारी (ता. ५) सुमेधने दिलेल्या तक्रारीवरुन शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan : पाकिस्तानची स्थिती ढासळली..! सरकारी शाळांतील शिक्षकांना आठ महिन्यांपासून पगार नाही?

Latur Assembly Election 2024 : लातूर विधानसभा यंदाच्‍या विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांवर उमेदवारांची मदार

Ranji Trophy 2024 : Shreyas Iyer, सिद्धेश लाडची सॉलिड सेंच्युरी, मुंबईचा संघ ३०० पार

Latest Marathi News Updates live : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अजून एकाला अटक

Jammu Kashmir Article 370: कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव; भाजप आमदारांनी फाडल्या प्रती

SCROLL FOR NEXT