School Going students esakal
जळगाव

शाळेचा पहिला दिवस; नाराजी.. घालमेल.. उत्सुकता तर कुठे जल्लोष!

सचिन जाेशी

जळगाव : कुठे नाराजी तर कुठे उत्साह.. काही वर्गात चिमुकल्यांसह (Kids) पालकांची घालमेल तर कुठे स्वागताचा जल्लोष... असे सार्वत्रिक चित्र सोमवारी (ता. १३) विविध शाळांच्या प्रांगणात (School Premises) दिसून आले. निमित्त होते, शाळेच्या पहिल्या दिवसाचे (First day of school). (schools started after 2 years of corona Jalgaon news)

कोरोनामुळे गेल्या दोन्ही वर्षी शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरु होऊ शकले नव्हते. अशातच गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यात वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे शाळा सुरु होण्याबाबत अनिश्‍चितता पसरली होती. मात्र, आणखी शैक्षणिक नुकसान नको म्हणून शासनाने शाळा सुरु करण्यावर ठाम भूमिका घेतली आणि सोमवारपासून शाळा सुरु झाल्या.

आदेशामुळे संभ्रम
गेल्या आठवड्यात शिक्षणमंत्र्यांनी सर्व शाळा १३ जूनपासून सुरु होतील, अशी भूमिका मांडली. मात्र आठवड्याच्या शेवटी अगदी शुक्रवार, शनिवारी सर्व शाळा १५ जूनपासून सुरु करण्याबाबत आदेश दिलेत. त्यातून संभ्रम निर्माण झाला. मात्र, तोवर बहुतांश शाळांनी पालकांना निरोप देऊन १३ जूनची तारीख ठरवली व त्यादृष्टीने नियोजनही करुन ठेवले. आता जिल्हा परिषदेसह शासकीय शाळा १५ जूनपासून सुरु होणार आहेत.

पहिला दिवस जल्लोषात
दरम्यान, आज काही शाळांनी आपले शैक्षणिक वर्ष सुरु केले. शहरातील विवेकानंद प्रतिष्ठानच्या सर्व, केसीई सोसायटी अंतर्गत असलेल्या शाळाही सुरु झाल्या. सेंट टेरेसा, किडस्‌ गुरुकुल आदी शाळांचीही घंटा सोमवारीच वाजली.

शिक्षणाच्या गुढीने स्वागत
विवेकानंद प्रतिष्ठान संचालित डॉ. अविनाश आचार्य विद्यालय पूर्व प्राथमिक विभागात शिक्षणाची गुढी उभारून शाळेचा प्रारंभ करण्यात आला. शाळेत पहिल्याच दिवशी मनोरंजनात्मक गोष्टींचे आयोजन केले होते. बैठे-मैदानी खेळ, चित्रकला- हस्तकला आणि विशेष बाब म्हणजे मुलांची स्वाक्षरी म्हणून त्यांच्या हाताचा रंगीत ठसा त्यांनी शाळेत उमटवायचा. त्यातून ‘पुस्तक नंतर वाचा.. आता खेळा- नाचा’ या गाण्याची प्रत्यक्ष अनुभूती आली. मुख्याध्यापिका कल्पना बावस्कर यांच्या नेतृत्वात शिक्षकवृंदाने विद्यार्थ्यांसह पालकांचे स्वागत केले.

वृक्षसंवर्धनाचा संकल्प
विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळा वाघनगर, येथे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे ढोल- ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रांगोळी, रंगीत फुगे तसेच शालेय आवारात विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉइंट तयार करून आकर्षक पद्धतीने सजावट केलेली होती. मुख्याध्यापक हेमराज पाटील यांनी प्रत्येक वर्गाला एक झाड भेट देऊन त्याची लागवड आणि देखभाल, संगोपन करण्याची जबाबदारी प्रत्येक वर्गाला दिली.

ओरियन स्कूल
केसीई सोसायटीच्या ओरियन, ए.टी. झांबरे विद्यालयात विद्यार्थ्यांचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रांगणात विविधरंगी रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. तसेच वर्गही फुले, फुग्यांनी सजविले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT