Municipal employees sealing the shops of the Agricultural Produce Market Committee esakal
जळगाव

Jalgaon News: कृषी उत्पन्न बाजार समितीतील 12 दुकानांना लावले सील! जळगाव महापालिकेची मोहीम

कर न भरल्याने महापालिकेने कृषी उत्पन्न बाजार समितीतील १२ दुकानांना महापालिकेने आज सील लावले

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : कर न भरल्याने महापालिकेने कृषी उत्पन्न बाजार समितीतील १२ दुकानांना महापालिकेने आज सील लावले. प्रभाग समिती क्रमांक तीन अंतर्गत येणाऱ्या मार्केट यार्ड भागातील एकूण ६४ दुकानांची मालमत्ता कराची २८ लाख रुपये थकबाकी होती. (Sealed 12 shops in Agricultural Produce Market Committee Campaign of Jalgaon Municipal Corporation News)

महापालिका प्रशासनाकडून संबंधितांना यापूर्वीच अधिपत्र बजावले. परंतु संबंधितांनी थकबाकी भरलीच नाही, त्यामुळे महापालिकेने आज कारवाई करण्याचे आदेश देत, दुकाने सीलबंद करण्यासाठी एस एस पाटील व प्रकाश सोनवणे यांच्या अधिपत्याखाली दोन पथकांची नियुक्ती केली.

दोन्ही पथकात प्रत्येकी दहा कर्मचारी नेमून ही मोहीम राबविताना दिवसभर १२ दुकाने सील केली.

दुकानदारांनी रक्कम भरली

कारवाई टाळण्यासाठी २४ दुकानदारांनी ९ लाखांचा भरणा केला. तर थकबाकी न भरणाऱ्यावर उद्या मंगळवारी (ता.९) कार्यवाही केली जाणार आहे.

ज्या मिळकतधारकांनी, मालमत्ता थकबाकी धारकांनी अभय शास्ती माफी योजनेचा लाभ घेतल्यानंतरही थकबाकी भरलेली नाही अशावर प्रशासन यापुढे मालमत्ता जप्ती कार्यवाहीत सातत्य ठेवणार आहे.

त्यामुळे थकबाकी भरणा केलेला नसलेल्या मिळकतधारकांनी त्वरित थकबाकी भरुन जप्तीची कार्यवाही टाळावी. असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड व उपायुक्त निर्मला गायकवाड व सह आयुक्त गणेश चाटे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT