Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : लाखो रुपयांची थकबाकीची वसुली रखडली

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : घरपट्टी व मालमत्ता करवसुलीसाठी नगरपालिकेने लाखो रुपये थकबाकी असलेल्या सहा पतपेढ्या, सहा दुकाने सील करून १३ नळजोडण्या बंद केल्या आहेत.

मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या आदेशाने उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, करनिरीक्षक जगदीश परमार, शेखर देशमुख, गणेश शिंगारे यांच्या पथकाने सकाळी कारवाईची धडक मोहीम सुरू केली. धुळे रोडवरील सहा दुकाने सील केली. (Sealing of outstanding loans from municipality Recovery of lakhs of rupees was stopped Jalgaon News)

काही दुकानदारांनी कारवाई सुरू होताच ९७ हजार ५०० रुपये थकबाकी भरली. तर न्यू प्लॉट भागात १३ नागरिकांकडे पाणीपट्टी कर बाकी असल्याने त्यांच्या नळजोडणी बंद करण्यात आल्या.

त्याचप्रमाणे आशापुरी नागरी पतपेढीकडे १ लाख ६३ हजार ३४ रुपये थकबाकी, पूर्णवाद नागरी सहकारी पतपेढीकडे ९७ हजार ५७४, मंगलमूर्ती नागरी पतपेढी ९ लाख ९८ हजार ३४३ रुपये, श्रीराज नागरी पतपेढी ४ लाख ६५ हजार ४५०, मैत्रेय प्लॉटस अँड डेव्हलपर्स यांच्या दोन मालमत्ताकडे ५ लाख ५२ हजार ४७२ रुपये अशी एकूण २२ लाख ७६ हजार ८७३ रुपये थकबाकी असल्याने त्यांना देखील सील लावण्यात आले आहे.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

"अनेक व्यावसायिक तसेच घरगुती खातेधारकांकडे पालिकेची थकबाकी असल्याने पालिकेचे उत्पन्न बुडत आहे. थकबाकीदारांनी लवकरात लवकर पालिकेची थकबाकी भरावी, अन्यथा जप्तीची तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल."

- प्रशांत सरोदे , मुख्याधिकारी, अमळनेर पालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT