seized 11 kg of ganja in Amalner Jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अमळनेरात 11 किलो गांजा जप्त

तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल; शीतलकुमार नाईक यांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरात मोटरसायकलवरुन गांजा आणणाऱ्या दहिवद येथील तरुणावर पोलिसांनी छापा टाकून त्याच्याजवळून ११ किलो गांजा जप्त केल्याची घटना मंगळवारी (ता. २) पहाटे दीडच्या सुमारास धुळे रस्त्यावरील रेणुका टाईल्सच्या मागे घडली. (seized 11 kg of ganja in Amalner Jalgaon crime news)

शहरात एक तरुण मोटरसायकलवर गांजा विक्रीसाठी आणत असल्याची गुप्त माहिती येथील पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक यांना मिळाल्यावर त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर यांना माहिती देऊन ते आपले सहकारी किशोर पाटील, शरद पाटील, नीलेश मोरे, रवींद्र पाटील, दीपक माळी, गणेश पाटील, जितेंद्र निकुंभे व सुनील महाजन यांना घेऊन धुळे रस्त्यावरील साई दरबार हॉटेलजवळ दबा धरून बसले.

एक तरुण मोटरसायकलला दोन काळ्या रंगाच्या पिशव्या घेऊन रेणुका टाईल्सच्या मागे लपला असल्याची माहिती मिळताच त्याच्यावर पथकाने छापा टाकला.

त्याच्याजवळील पिशव्यांमध्ये १ लाख ६५ हजार रुपये किमतीचा गुंगी आणणारा ११ किलो ७५ ग्रॅम ओलसर गांजा आढळून आला. संशयिताने त्याचे नाव पिंट्या देवराम रावत (वय २४, रा. उमरापाणी, ता. वारला, जि. बडवाणी, हल्ली मुक्काम दहिवद ता. अमळनेर) असल्याचे सांगितले.

पोलिसांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या समक्ष पंचनामा करून पिंट्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT