Cotton News esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : खानदेशातील शेतकऱ्यांची पांढऱ्या सोन्याला पसंती

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील ९५ टक्के पूर्ण झाल्या आहेत. आजअखेरपर्यंत ७ लाख ३८ हजार ५२० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

खानदेशचे पांढरे सोने अशी ओळख असणाऱ्या कापसाला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळाली असून, ५ लाख ५८ हजार ७८० हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली आहे. (Seven and half lakh in district Sowing done in hectare area jalgaon news)

जिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण सरासरी क्षेत्र ७ लाख ६९ हजार ६०१ हेक्टर इतके आहे. यंदा जून महिना हा कोरडा गेला आहे. कापूस लागवडीस उशीर झाला. मात्र, जुलैपासून चांगला पाऊस पडण्यास सुरवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या पावसामुळेच खरीप पेरण्यांना गती आली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, मका, इतर तृणधान्य, तूर, मूग, उडीद, इतर कडधान्य, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, इतर गळीतधान्य, कापूस, तसेच नवीन ऊस पिकाची लागवडही केली जाते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जिल्ह्यात खरीप हंगाम ऊस पिक वगळून ७ लाख ३४ हजार ६०६ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. नवीन ऊस पिक लागवडीसह ७ लाख ३८ हजार ५२० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

कापसाखालोखाल मका- ८६ हजार १९९ हेक्टर, ज्वारी- २० हजार ७६२, सोयाबीन- १७ हजार ७१८, उडीद- १४ हजार ७५८, तूर- १० हजार ८२५, मूग- १३ हजार ७८७, बाजरी- ७ हजार ८५४, नवीन ऊस लागवड- ३ हजार ९१४, इतर तृणधान्य- २ हजार ३६०, भुईमूग- ९००, इतर कडधान्य- ४६४, तीळ- १७४, सूर्यफूल- १४ व इतर गळीतधान्य ११ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT