Jalgaon News : आपल्या शाहिरी कलेने गेल्या चार दशकांपासून श्रोत्यांना खिळवून प्रबोधन करणारे वयाच्या सत्तरीत शाहिरी कला आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन जपणारे पुरस्काराने धनी असलेले महाराष्ट्र शाहीर परिषदेचे राज्य संघटक शाहीर शिवाजीराव पाटील अद्यापही बेघर असल्याने त्यांना कुणी घर देते का घर? अशी म्हणण्याची वेळ आली आहे. (shahir Shivajirao Patil is still homeless nagardeola jalgaon news)
शाहीर शिवाजीराव पाटील हे शेतकरी कुटुंबात जन्मलेले, जेमतेम आठ बाय पंधराचे त्यांचे मातीचे घर कुटुंबात सहा सदस्य २०२१ मध्ये पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे त्यांचे होते ते घरही कोसळले. तत्कालीन मंत्र्यांनी दिलेले आश्वासन हे अश्वासनच राहिले. आज देखील ते भाड्याच्या घरात राहत आहेत.
जेमतेम दीड एकर कोरडवाहू शेती, निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेला खर्च निघणे अवघड होऊन बसते. कलावंतांना राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करते, मग शाहिरावर अशी वेळ का घोडं कुठे पेंड खाते, त्या प्रसंगी तालुक्याचे आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण व चाहत्यांनी त्यांच्या परिने सहकार्य केले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
एका सहकारी कलावंताने आठशे स्क्वेअर फूट जागा अल्प दरात उपलब्ध करून दिली, ती बांधावी तर कशी? असा प्रश्न उपस्थित होतोय. शाहिरांनी मंत्रालयातील तत्कालीन व विद्यमान मंत्र्यांकडे चकराही मारल्या, निवेदन दिलीत. वरून आदेश निघतात, मग मदत कुठे अडते. आता पावसाळा येऊन ठेपला. केवळ आश्वासनच मिळते, मात्र जिल्हा प्रशासन सांगते की अशी कुठलीही योजना नाही.
मला राहायला घर मिळेल का घर? अशी अपेक्षा श्री. पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. या बाबीकडे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग यांनी खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची गरज असून कलावंतांच्या अडचणी लक्षात घेता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.