Sharad Pawar  esakal
जळगाव

Jalgaon Sharad Pawar : लोकसभेसाठी पवार कोणता मंत्र देणार? निवडणुकीबाबत पदाधिकाऱ्यांशी आज चर्चा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Sharad Pawar : जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघ आहेत. एका पोटनिवडणुकीतील जळगाव लोकसभेतील ‘राष्ट्रवादी’चा विजय वगळता गेली पाच टर्म भारतीय जनता पक्षाकडेच आहे. (sharad pawar attention of district is on what mantra Sharad Pawar will give for Lok Sabha jalgaon news )

या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीचा पर्यायाने महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार शुक्रवारी (ता. १६) कोणता मंत्र देणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

अमळनेर येथे राष्ट्रवादीच्या ग्रंथालय सेलच्या अधिवेशनासाठी शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड येत आहेत. खासदार पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची टीम जळगाव जिल्ह्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

शरद पवार गुरुवारी (ता. ८) रात्री आठला राजधानी एक्सप्रेसने मुंबईहून जळगावला दाखल झाले आहेत. अजित पवार व जयंत पाटील दोंडाईचा (जि. धुळे) येथील कार्यक्रमानंतर अमळनेरला येणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, खासदार पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांची बैठक अमळनेरला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात होणार आहे. श्री. पवार जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील व आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.

दोन्ही लोकसभा निवडणुका पक्ष व महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याबाबत चर्चा होईल. त्या दृष्टीने शरद पवार आढावा घेणार असून, ते मार्गदर्शनही करणार आहेत. त्यामुळे दोन्ही लोकसभेसाठी कोणता मंत्र देणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

दरम्यान, जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघ सद्यस्थितीत भाजपच्या ताब्यात आहेत. गेली पाच टर्म दोन्ही मतदारसंघ भाजपच्याच ताब्यात आहेत.

त्या अगोदर मतदारसंघ कॉंग्रेसकडे होते, तर एका पोटनिवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला यश मिळाले होते. वसंतराव मोरे निवडून आले होते. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसने लढले होते.

मात्र, त्यांना यश आले नाही. जळगाव लोकसभेतून गुलाबराव देवकर यांचा विजय निश्‍चित मानला जात होता. मात्र, मोदी लाटेत त्यांनाही अपयश आले. या वेळीही दोन्ही लोकसभा मतदारसंघ पक्षाने लढविण्याचे ठरविले आहे.

भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षाने विधान परिषदेवर प्रतिनिधित्व दिले आहे. त्यांच्याकडे निवडणुकांची खानदेशची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर या पहिल्यादांच निवडणूक होणार असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचीही कसोटी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT