Sharad Pawar Latest News : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची मंगळवारी (ता. ५) जळगाव शहरात भव्य जाहिर सभा होत आहे. येथील सागर पार्क मैदानावर दुपारी दीडला ही सभा होईल.
सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी भव्य वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, रोहित पाटील यांचीही उपस्थिती राहणार आहे. (sharad pawar in Jalgaon for public meetings jalgaon news)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे, माजी आमदार डॉ. सतीश पाटील आदी सभा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
दरम्यान, शरद पवार मेहरूण भागातही भेट देणार आहेत. जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या मेहरूण येथील निवासस्थानी ते भेट देणार आहेत. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.
पवार यांचा दौरा
शरद पवार यांचा अधिकृत दौरा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांच्याकडे प्राप्त झाला आहे. त्यानुसार सकाळी नऊला ते मुंबई विमानतळावर दाखल होतील. तेथून ९ वाजून ५० मिनीटांनी ते विमानाने जळगावकडे रवाना होतील.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सकाळी दहाला जळगाव विमानतळावर उतरतील व दहा वाजून १५ मिनीटांनी मेहरूणकडे रवाना होतील. सव्वा दहा ते दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत ते मेहरूण येथे महापौर जयश्री महाजन यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देतील.
त्यानंतर साडे दहाला जैन हिल्सकडे रवाना होतील. दहा वाजून पन्नास मिनीटांनी ते जैन हिल्स येथे पोचतील. दुपारी १२ ते १ वाजून १५ मिनीटापर्यंत जैन हिल्स येथे पत्रकार परिषद होईल. त्यानंतर १ वाजून १५ मिनीटांनी ते जैन हिल्सवरून सागरपार्क येथे सभेसाठी रवाना होतील.
दुपारी १ वाजून तीस मिनीटे ते साडेचारपर्यंत ते जाहिर सभेसाठी थांबतील. तेथून साडेचारला जळगाव विमानतळाकडे रवाना होतील. चार वाजून पन्नास मिनीटांनी विमानाने ते मुंबईकडे रवाना होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.