Jalgaon News : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश ग्रंथालय विभागाच्या एक दिवसीय शिबिराचे आयोजन अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित केले आहे. (Sharad Pawar Jayant Patil Ajit Pawar in Amalner on 16th june jalgaon news)
या शिबिराचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते उद्घाटन होईल. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील (Jayantrao Patil) अध्यक्षस्थानी राहतील.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्यभरातील अनेक नेते अनेक विभागांचे अध्यक्ष व महाराष्ट्रातील ग्रंथालय विभागाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी या शिबिराला हजर राहणार आहेत. शिबिराच्या समारोप कार्यक्रमास विधानसभेचे विरोधी पक्षनेते नामदार अजित पवार ह्यांची प्रमुख उपस्थिती असेल.
अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) हे १६ जून रोजी येत आहेत.
दिवसभर शिबिरार्थींसाठी विविध वक्त्यांची महत्त्वपूर्ण मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत. आज मुंबईत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्यातील लोकसभा उमेदवारांबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी या कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.