BHR Scam esakal
जळगाव

BHR Scam Update : संचालक, अवसायक, कर्जदार आता खंडणीचा गुन्हा; गुन्ह्यांची मालिका सुरूच

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : बीएचआर (BHR Scam) ठेवी अपहार प्रकरणातील संशयित सुनील झंवर यांच्या मुलाकडून १ कोटी २० लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात विशेष एसआयटी पथकाकडे तपास सुरू आहे.

गुन्ह्यातील संशयित तथा फॉरेन्सीक ऑडिटर शेखर सोनाळकर यांनी पोलिस मुख्यालयात एसआयटी कार्यालयात जबाब नोंदवून या गुन्ह्याशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. स्वत: सोनाळकर यांनी याबाबत ‘सकाळ’ला माहिती दिली. (Shekhar Sonalkar suspect crime filed statement at SIT office at police headquarters clarified that he had no connection BHR scam jalgaon news)

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सोसायटीत तत्कालीन संचालकांनी केलेल्या कथित कोट्यवधींच्या गैरव्यवहारप्रकरणी वेगवेगळ्या ठिकाणी अनेक गुन्हे आहेत. त्यानंतर पतसंस्था अवसायनात निघून अवसायक नियुक्त करण्यात आला. ‘कुंपणच शेत खाते’नुसार या काळातही पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण समोर आले. त्यानंतरही ‘बीएचआर’ने वेगवेगळ्या गुन्ह्यांची मालिका सुरूच ठेवलीय.

घटनाक्रम १ प्रमोद रायसोनींवर पहिला गुन्हा

भाईचंद हिराचंद रायसोनी को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणात पहिला गुन्हा संचालक अंकल ऊर्फ प्रमोद रायसोनी आणि गँगवर दाखल करण्यात आला. यानंतर शासनाने ठेवीदारांच्या ठेवींची परतफेड करण्यासाठी व कामासाठी अवसायकाची नियुक्ती केली.

अंकल रायसोनी व त्याच्या संचालक मंडळाविरुद्ध दाखल ७६ गुन्ह्यांच्या तपास होऊन संचालक मंडळाविरुद्ध गुन्ह्याचे एकत्रीकरण करून एकच ठिकाणी खटल्याचे काम सुरू आहे, तर दुसरे प्रकरण अवसायक जितेंद्र कंडारे यांनी ठेव पावत्या नाममात्र ३० टक्के दराने मिळवून त्या जमा करून धनिकांची मोठी कर्जप्रकरणे निल करण्यासाठी त्या ठेव पावत्यांचा वापर केला.

हेही वाचा : ढोलेरा- ग्रीनफिल्ड सिटी आणि महाप्रचंड औद्योगिक हब...

संचालक मंडळाच्या कार्यकाळात झालेला अपहार व अवसायक नियुक्तीनंतर होत असलेल्या कामाचा अहवाल फॉरेन्सीक ऑडिटर शेखर सोनाळकर यांनी सीआयडीला सोपविला. त्यांनी तो जिल्हा न्यायालयात २ फेब्रुवारी २०२० ला सादर केला. या अहवालात झपाट्याने मालमंत्ताचे झालेले खरेदी-विक्रीचे व्यवहार कशा पद्धतीने घडवून आणले गेले, हे अहवालाच्या शेवटच्या खंडात नमूद आहे.

घटनाक्रम २ ठेव पावती मोड प्रकरण

शहरातील एका नगरसेवक पत्नीने ठेव पावत्यांची होणाऱ्या मोडबाबत दखल घेत थेट केंद्रीय मंत्री राधा मोहनसिंह यांना तक्रार केल्यावर सिंह यांनी महाराष्ट्र शासनाला याप्रकरणी दखल घेण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर महाराष्ट्राच्या गृहखात्याने मुंबई आर्थिक गुन्हेशाखेला आदेश दिल्यावर तेथून प्रकरण जळगाव पोलिस दलाकडे आले.

मात्र, जळगाव आर्थिक गुन्हे शाखेऐवजी स्थानिक गुन्हेशाखेच्या तत्कालीन निरीक्षकांनी हे प्रकरण हाताळले. त्यानंतर ऑडिटर महावीर जैन यांची नियुक्ती करण्यात येऊन अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या कारनाम्यांची चौकशी करणाऱ्या जैन या ऑडिटरची नियुक्ती आणि वेतन (फी) कंडारे यांच्याकडूनच दिले जात होते.

अर्थात, कायद्यानुसार ठेवी कर्जात जमा करता येत नसताना जैन यांनी दिलेल्या अहवालानुसार ठेवी कर्जात जमा करता येतात व त्याचे सर्व अधिकार अवसायक म्हणून जितेंद्र कंडारे यांना आहे, असे नमूद केले आणि इथेच नव्या गुन्ह्याची पायाभरणी झाली.

घटनाक्रम ३ कारायला गेले काय?

‘बीएचआर’च्या ठेवपावती मोड प्रकरणात कारवाई होण्याऐवजी गैरकृत्य अधिकृत करवून घेतल्याचे आढळून आल्यावर ॲड. कीर्ती पाटील यांनी दिल्लीत जाऊन पुन्हा केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्यावर या प्रकरणात त्यांनी महाराष्ट्र शासनाला प्रकरण गांभीर्याने हाताळण्याच्या सूचना केल्या. त्यावरून महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांची नियुक्ती करण्यात आली.

नवटके यांचे थेट रिपेार्टिंग गृहसचिवांना होते. गुन्ह्याच्या संपूर्ण तपासाची मदार त्यांच्यावर असल्याने बदली झाल्यावरही या गुन्ह्याचा तपास त्यांच्याकडेच राहिला. त्यांनी सुयोग्य पद्धतीने तपास करून पुणे येथे अवसायक जितेंद्र कंडारे, लेखापरीक्षक महावीर जैन यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यात जळगाव शहरातील मातब्बर मंडळींना अटक करून न्यायालयात त्यांना पैसे भरण्यास भाग पाडले.

घटनाक्रम ४ खंडणीचा गुन्हा

ठेव मोड आणि बीएचआरची मालमत्ता विक्री प्रकरणात सुनील झंवर, सूरज झंवर या पिता पुत्राला अटक झाली. साधारण वर्षभरानंतर न्यायालयाने जामिनावर मुक्तता केल्यानंतर तक्रारदार सूरज झंवर याने खंडणी मागितल्याप्रकरणी १६ जानेवारी २०२३ ला पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात ॲड. चव्हाण, लेखापरीक्षक शेखर सोनाळकर, उदय पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दाखल गुन्हा जळगाव पोलिसांकडे आल्यावर चाळीसगाव पोलिसांत नोंद झाली. गुन्ह्याचा तपास सुरवातीला स्थानिक गुन्हेशाखेला आणि त्यानंतर विशेष एसआयटी गठीत करण्यात आली. ॲड. प्रवीण चव्हाण यांचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला असून, सोनाळकर यांना सशर्त अटकपूर्व जामीन दिला आहे, तर उदय पवार पोलिसांना मिळून आलेले नाहीत.

त्यावेळी मी नागपुरात

तक्रारदार सूरज झंवर याने नोंदविलेल्या फिर्यादीत नमूद २० ते २६ नोहेंबरच्या कालखंडात मी नागपूर पोलिस जिमखाना येथे फॉरेन्सीक ऑडिटींगच्या कामानिमित्त व्यस्त होतो. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत क्राईम ब्रांचच्या पोलिस अधिकाऱ्यांसह काम सुरू होते.

तक्रारीत १ कोटी २० लाख खंडणीचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे, तसेच सिग्नल ॲपवरून बोलणे झाल्याचे नमूद आहे. तो दिवस २६ नोव्हेंबर. त्या दिवशी मी सायंकाळी पाचला विदर्भ एक्सप्रेसने जळगावला येण्यासाठी निघालो होतो. तिकिटासह सर्व नोंदी आपल्याकडे आहेत, असेही सोनाळकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT