Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon News : मनपा अधिकाऱ्यांच्या पदांची खांदेपालट

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिका आयुक्त देवीदास पवार यांनी पदभार घेतल्यानंतर प्रथमच अधिकाऱ्यांच्या विभागाची खांदेपालट केली आहे. त्यांनी घेतलेल्या या अचानक निर्णयामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे.

महापालिका आयुक्त देवीदास पवार यांनी परभणी येथून जळगाव महापालिकेत आयुक्तपदाचा कारभार स्वीकारला. मात्र, बदली झालेल्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी बदलीला ‘मॅट’मध्ये आव्हान दिल्यानंतर त्यांच्या बदलीला स्थगिती मिळाली. (Shifting of posts of municipal officials First reshuffle by Commissioner after assuming office Jalgaon News)

याशिवाय त्यांच्याकडे खुला भूखंड, मार्केट वसुली विभाग, विधी शाखा, किरकोळ वसुली, घरकुल, एलबीटी, अग्निशमन, अतिक्रमण, मिळकत व्यवस्थापन हे विभाग देण्यात आले आहेत. नगररचना सहाय्यक संचालक के. पी. बागूल यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार काढून घेतला आहे. प्रभारी सहाय्यक आयुक्त सुनील गोराणे यांच्याकडे असलेला दवाखाना विभागाचा पदभार काढून घेतला आहे.

त्यांच्याकडे नगरसचिव विभागासोबत भांडार, अभिलेख, क्रीडा, ग्रंथालय, शिक्षण विभागाचा पदभार देण्यात आला आहे. प्रभारी सहाय्यक आयुक्त (आरोग्य) यांच्याकडे आता स्वच्छता विभागासह, दवाखाने विभागही देण्यात आला आहे.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

अधिकारी व त्यांचे खाते असे :

अभिजित बाविस्कर (सहाय्यक आयुक्त, प्रभारी उपायुक्त) : आस्थापना विभाग, टेलीफोन विभाग, जनसंपर्क, बारनिशी, जनगणना, निवडणूक ( कार्यालय अधीक्षक), महिला व बालकल्याण विभाग

गणेश चाटे : (सहाय्यक आयुक्त, प्रभारी उपायुक्त महसूल) : प्रभाग समिती क्रमांक १ ते ४, खुला भूखंड, मार्केट वसुली, विधी शाखा, किरकोळ वसुली, घरकुल, एलबीटी, अग्निशमन, अतिक्रमण, मिळकत

उदय पाटील (शाखा अभियंता, प्रभारी सहाय्यक आयुक्त आरोग्य) : दवाखाने, आरोग्य, मलेरिया, स्वच्छता, वाहन व्यवस्था

सुनील गोराणे (वरिष्ठ लिपिक तथा प्रभारी सहाय्यक आयुक्त) : भांडार, अभिलेख, एनयूएलएस, क्रीडा, ग्रंथालय व शिक्षण विभाग

चंद्रकांत सोनगिरे (शाखा अभियंता तथा प्रभारी शहर अभियंता) : बांधकाम विभाग, पर्यावरण विभाग, विद्युत विभाग, प्रकल्प विभाग

डॉ. विकास पाटील (आरोग्याधिकारी तथा निबंधक जन्म मृत्यू विभाग) : जन्म- मृत्यू विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT