Bridge Work Pending esakal
जळगाव

Jalgaon News : महामार्ग Upgradation चा प्रस्ताव रखडलेलाच!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नव्याने झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ जळगाव शहराबाहेरून (बायपास) गेल्याने शहरातील महामार्गाचे अपूर्ण व सदोष चौपदरीकरण उरकण्यात आले. त्यानंतर नागरिक व विविध संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर शहरातील महामार्गाच्या अपग्रेडेशनचा प्रस्ताव अद्यापही रखडलेलाच आहे.

या चौपदरीकरणातून सुटलेल्या दोन टप्प्यांतील कामासह शिव कॉलनीजवळील रेल्वे उड्डाणपूल व गिरणा नदीवरील बांभोरीच्या पुलाचाही समावेश आहे. (Shiv Colony Bridge Highway Upgradation proposal is called Two phase quadrification pending Siva Colony Bambhori bridge also proposed Jalgaon News)

फागणे-तरसोद-चिखली या दोन टप्प्यांत धुळे- जळगावातून जाणाऱ्या आधीच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व आताच्या क्रमांक ५३ चे चौपदरीकरण सुरू झाले. तरसोद-चिखली टप्पा किरकोळ काम वगळता पूर्ण झाला आहे. फागणे-तरसोद टप्प्यातील काम संथगतीने सुरू असून, पाच वर्षांतही ते पूर्ण होऊ शकलेले नाही. सध्या पाळधी ते तरसोद या टप्प्यातील १७ किलोमीटरच्या बायपास मार्गाचे काम सुरू आहे. या बायपासवर गिरणा नदीवरील पुलासह रेल्वे उड्डाणपुलाचा समावेश आहे.

‘बायपास’ने जळगाववर अन्याय

मात्र, या बायपास महामार्गाने जळगाव शहरावर अन्याय केल्याची नागरिकांची भावना आहे. कारण, बायपासमुळे पाळधी-जळगाव-तरसोद या जवळपास ११ किलोमीटरच्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम राहून गेले. विशेष बाब म्हणून जळगाव शहरातील खोटेनगर ते कालिंकामाता चौक या ७ किलोमीटर टप्प्याचे चौपदरीकरण झाले खरे; मात्र त्याचे काम निकृष्ट दर्जाचे व सदोष झाल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा, अपघाताची मालिका कमी झालेली नाही.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

चौकांची रचना जीवघेणी

तांत्रिकदृष्ट्याही जळगाव शहरातून जाणारा महामार्ग योग्य नाही, असा तज्ज्ञांचा दावा आहे. आकाशवाणी, इच्छादेवी व अजिंठा चौकातील सर्कल सदोष आहे. त्यामुळे महामार्गावरील अपघात वाढलेच आहेत. शिवाय, महामार्ग निर्मितीवेळी पथदीपांसाठी काही व्यवस्था न केल्याने महामार्गाचे दुभाजक तोडून ती व्यवस्था करावी लागली. तरीही पथदीप लागलेच नाहीत. त्यामुळे शहरातील महामार्ग चौपदरी होऊनही कुचकामी ठरतोय.

आता अपग्रेडेशन आवश्‍यक

सदोष महामार्गामुळे नागरिक आक्रमक झालेत. काही संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन, त्यातील दोष उघड केले, आंदोलनाचा पवित्रा घेतला. दोन-तीन बैठका होऊन त्यात महामार्गाच्या अपग्रेडेशनचे प्रस्ताव मांडण्यात आले.

या कामांसाठी पाठपुरावा हवा

अपग्रेडेशनमध्ये पाळधी ते खोटेनगर व कालिंकामाता चौक ते तरसोद फाट्यापर्यंतचे चौपदरीकरण, शिव कॉलनीजवळील रेल्वे उड्डाणपुलाचे विस्तारीकरण, आकाशवाणी चौक, अजिंठा चौकात उड्डाणपूल, अशी कामे प्रस्तावित आहेत. जोपर्यंत या टप्प्यात ही सर्व कामे पूर्ण होत नाहीत, तोवर शहरातील चौपदरी महामार्गाची उपयुक्तता शून्य ठरते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी, खासदारांनी त्यासाठी पुाठपुरावा करणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT