Sanjay Sawant Jalgaon Lok Sabha Election Map esakal
जळगाव

Lok Sabha Elections : जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढणार; जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत

जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) गटाची मोठी ताकद आहे. त्यामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडीतून आपल्याकडे घ्यावा, असे आपण वरिष्ठांना कळविले आहे.

कैलास शिंदे, जळगाव

Lok Sabha Elections : जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) गटाची मोठी ताकद आहे. त्यामुळे हा मतदारसंघ महाविकास आघाडीतून आपल्याकडे घ्यावा, असे आपण वरिष्ठांना कळविले आहे.

त्यांनीही याबाबतीत सकारात्मक निर्णय घेतला आहे, असा दावा शिवसेना (उबाठा) गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सांवत यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला.(Shiv Sena Thackeray group will contest Jalgaon Lok Sabha constituency jalgaon news)

लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मैदानाची तयारी आता सुरू झाली आहे. प्रशासनापासून तर थेट राजकीय पक्षापर्यंत सर्वजण आपल्या कामाला लागले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात राज्यात असलेल्या ४८ जागांच्या वाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

लवकरच त्यांचे जागावाटप होणार आहे. मात्र त्याअगोदर स्थानिक स्तरावरही महाविकास आघाडीत व महायुतीत आपल्याच पक्षाला ही जागा मिळावी, यासाठी रस्सीखेचही सुरू झाली असून, त्याचे दावेही करण्यात येत आहेत.

जळगाव जिल्ह्यात जळगाव व रावेर दोन मतदारसंघ आहेत. जळगाव लोकसभा व रावेर लोकसभा मतदारसंघ गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढविली होती. मात्र त्या वेळी त्यांच्यात शिवसेना हा भिडू नव्हता; मात्र आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेना हा तिसरा पक्ष या वेळी आलेला आहे. राज्यातील ४८ जागांपैकी महाविकास आघाडीने २३ जागा लढविण्याबाबत दावा केला आहे. मात्र मित्रपक्ष काँग्रेसने हा दावा खोडून काढलेला आहे.

त्यावर आता वरिष्ठ स्तरावर चर्चा होणार आहे. मात्र महाविकास आघाडीत आता स्थानिक स्तरावर दावे- प्रतिदावे सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या जळगाव लोकसभेवर आता शिवसेना (उबाठा) गटाने दावा केला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्याचे राजकारण आता खऱ्या अर्थाने वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनीच हा दावा केलेला आहे. प्रथमतः: त्यांनी हे स्पष्ट केले आहे, की शिवसेना (उबाठा) राज्यात महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूका लढविणार आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही जागेचा वाद उभा करावयाचा नाही; परंतु जळगाव लोकसभा मतदारसंघाची आजची स्थिती पाहता आम्ही ही जागा लढविण्यासाठी वरिष्ठांकडे आग्रहच नव्हे, तर ठासून मागणी केलेली आहे.

आपल्या दाव्यातील भक्कमपणा व्यक्त करताना ते म्हणाले, की आम्ही भाजपसोबत युतीत असतानाच जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या माध्यमातून लढण्याची तयारी केली होती. (कै.) आर. ओ. पाटील यांनीही त्याबाबत पूर्ण तयारी केली होती, त्यांनी मतदारसंघाची पूर्ण चाचपणी करून आपली उमेदवारीही भक्कम केली होती. परंतु दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यामुळे आम्ही त्या वेळी या लोकसभेच्या जागेची मागणी केली नाही.

आज आम्ही महाविकास आघाडीत आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे आमचे मित्रपक्ष आहेत. आमच्यात समन्वयाने जागावाटप होणारच आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. या वेळी या जागेची मागणी आम्ही केलेली आहे. वरिष्ठांनीही आमच्या मागणीला सकारत्मकता दर्शविली आहे.

उन्मेष पाटील आमच्याच मतावर विजयी

गेल्या वेळी ही जागा युतीत भाजपकडे होती. या मतदारसंघात उन्मेष पाटील विजयी झाले होते. त्यांच्या विजय हा आमच्या शिवसैनिकांच्या मतावरच झालेला आहे. या ठिकाणी सर्व सहा मतदारसंघात आमची भक्कम ताकद आहे. जळगाव ग्रामीण, पाचोरा, पारोळा-एरंडोल मतदारसंघात शिवसेनेलाच यश मिळाले

आहे. फुटून गेलेल्या आमदारांना शिवसेनेचीच मते मिळाली आहेत. आजही त्यांना आमचे आव्हान आहे, की त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन पुन्हा मैदानात यावे. शिवसैनिक त्यांचा निश्चि‍त पराभव करतील. लोकसभा निवडणुकीत उमेदवार जिंकण्याची सर्व गणित आमच्याकडे आहेत, त्यामुळे आम्ही या मतदारसंघावर दावा करीत आहोत.

निवडून येणारा भक्कम उमेदवार

जळगाव लोकसभा मतदारसंघात निवडून येणारा भक्कम उमेदवार आमच्याकडे असल्याचा दावा करून ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मोठ्या फरकाने पराभूत करू शकेल असा उमेदवार आमच्याकडे आहे. सोबत शिवसैनिकांची आणि सर्वसामान्य मतदारांची ताकद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदेंसाठी भाजपचा 'प्लॅन बी' तयार, दिल्लीत हालचाली वाढल्या!

IPL 2025 Mega Auction Live Streaming: बंगळुरूने तगडा खेळाडू जाऊ दिला, मुंबई इंडियन्सने संधीचं सोनं केलं

Kolhapur Result : ताकदीने लढा देऊनही 'त्यांना' विजयाची 'तुतारी' फुंकता आली नाही; शरद पवारांसमोर आता मोठं आव्हान!

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने मानले ऐश्वर्याचे आभार ; "ती आराध्याजवळ घरी आहे म्हणून..."

MLA Bapusaheb Pathare : वडगाव शेरी विधानसभा नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे वाहतूक कोंडी अन् पाणीप्रश्न सोडविणार

SCROLL FOR NEXT