Crushed Dogs esakal
जळगाव

Jalgaon : बापरे..! जिल्ह्यात ४२० जणांना चावले पिसाळलेले कुत्रे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्राण्यांच्या चाव्यांवर गेल्या महिन्यात ४२० नागरिकांनी उपचार घेतले आहेत. यात कुत्र्याच्या चाव्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. नागरिकांनी प्राण्यांपासून सतर्क राहावे, त्यांना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करू नये, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्राण्यांच्या चाव्यांवर उपचार घेण्यासाठी नागरिक रोज येत असतात. गेल्या सप्टेंबरमध्ये कुत्रा चावला म्हणून २७० पुरुष, ५६ महिला, लहान बालके ७३ अशा एकूण ३९९ जणांनी उपचार घेतले, तर मांजरीच्या चाव्यावर नऊ पुरुष, माकड चावला म्हणून एका पुरुषाने उपचार घेतले आहे.

तसेच, माणूस चावला म्हणून चार पुरुष, डुक्कर चाव्यावर एक पुरुष, ससा चाव्यावर एक लहान मुलगी, उंदीर चाव्यावर तीन नागरिकांनी उपचार घेतले आहेत.(Shocking News 420 peoples bitten Crushed dogs Jalgaon news)

कुत्रा चावण्याची ही आहेत कारणे

पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पिसाळलेला कुत्रा चावल्यावर त्याच्यावर लक्ष ठेवले जाते. तो जिवंत असेल, तर ठीक; पण त्याचा मृत्यू झाल्यास धोका असतो. एखाद्या कुत्र्याला रेबिज असेल, तर तो चार ते दहा दिवसांत मृत्युमुखी पडतो. भटक्या कुत्रा कोणाला चावल्यास, त्याला त्याच दिवशी संसर्ग झाला असावा, असं मानलं जातं. कुत्र्याला रेबिज असेल, तर लवकरात लवकर इंजेक्शन घ्यावे लागते. डम्ब रेबिजमध्ये कुत्र्याच्या शरीरातील नसा ढिल्या होऊन तो एखाद्या कोपऱ्यात पडून राहतो. नंतर पॅरालिसिस होऊन चार दिवसांत मरतो. फ्युरियस फॉर्म ऑफ रेबिजमध्ये कुत्र्याला मरायला दहा दिवस लागतात. यादरम्यान तो आक्रमक होतो. लाळ गिळताना त्याला त्रास होतो. त्यामुळे ती टपकत राहते. घशातील नसा पॅरालाईज्ड होऊन तो चावा घ्यायला लागतो.

कुत्रा चावल्यावर जखम वाहत्या पाण्याखाली धुऊन घ्यावी, त्याला स्वतःहून पट्टी बांधू नये. तत्काळ शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आले पाहिजे. उपचारास उशीर करणे जीवाला महाग पडू शकते. पाळीव प्राण्यांसोबत खेळताना सावध राहावे.

डॉ. विजय गायकवाड

वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT