जळगाव

Shreeram Rathotsav 2023: लोक आले दर्शनाले.. लोक झुंड्यावर झुंड्या। भागवत भक्तीच्या मेळ्यात रथोत्सव साजरा

सकाळ वृत्तसेवा

Shreeram Rathotsav 2023: लोक आले दर्शनाले, लोक झुंड्यावर झुंड्या।

रथापुढती चालल्या, किती भजनाच्या दिंड्या॥

झेंडूच्या फुलांनी सजवविलेला भव्य रथ.. त्याला ओढणारे सेवेकरी.. शोभायात्रेत जागोजागी रथ थांबविण्यासाठी मोगरी लावणारे गडी.. सियावर रामचंद्र की जयचा गजर.. अन्‌ प्रतिपंढरपूरचे दर्शन घडविणारे चैतन्य.. असा श्रीराम रथोत्सव हजारो भक्तांच्या साक्षीने पार पडला.. रथाच्या चाकावर डोकं ठेवत, तर काहींनी दुरूनच नमन करत रथाचे दर्शन घेतले.. (Shree Ram Rathotsav 2023 celebrated in jalgaon news)

जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेले श्रीराम मंदिर संस्थानच्या (रामपेठ) विद्यमाने कार्तिकी एकादशीला निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भव्य श्रीराम रथोत्सव कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला गुरुवारी रामनामाच्या गजरात पार पडला.

पहाटेपासून कार्यक्रम

दिवशी पहाटे चार वाजता काकड आरती, प्रभू श्रीरामांच्या उत्सव मूर्तीस महाभिषेक, सकाळी सात वाजता महाआरती, सकाळी साडेसात ते साडेआठ सांप्रदायिक परंपरेचे भजन त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात सकाळी साडेदहा वाजता गादीपती हभप मंगेश महाराज जोशी यांच्याहस्ते व शहरातील समस्त ब्रह्मवृंद मंडळी यांच्या वेद मंत्रघोषात पूजन झाले.

यांची होती उपस्थिती

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, रथोत्सव समितीचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, कार्याध्यक्ष तथा पोलिस पाटील प्रभाकर पाटील, उद्योजक अशोक जैन, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील, शनिपेठ ठाण्याचे पोलिस निरीक्षक, माजी महापौर, माजी उपमहापौर, सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव, नंदू आडवाणी, जळगाव जनता बँक अध्यक्ष सतीश मदाने, जळगाव पीपल्स बँक अध्यक्ष अनिकेत पाटील, सुनील भंगाळे, विष्णू भंगाळे, चंद्रकांत गवळी, चंदन कोल्हे, आदी मान्यवरांचा श्रीफळ व उपरणे देवून सत्कार करण्यात आला.

मूर्ती रथावर विराजमान

उत्सव मुर्ती रथावर आरूढ झाल्यावर पुन्हा आरती करण्यात आली त्यानंतर अपूर्व उत्सवात रथ ग्राम प्रदक्षिणेस मार्गस्थ झाला. मागील बाजूस रथ आल्यावर तेलंगणा राज्यातील निजामाबाद, हंडे केलूर गावातील वेदमूर्ती गजानन कुलकर्णी यांच्याहस्ते आरती करण्यात आली.

असे केले मार्गक्रमण

श्रीराम मंदिर, भोईटेगढी, आंबेडकर नगर, तेली चौक, श्रीराम मंदिराचे मागील गल्लीतून, रथ चौक, बोहरा गल्ली, दाणा बाजार, अन्नदाता हनुमान मंदिर, चैतन्य मेडिकल समोरून, प्रकाश मेडिकल, घाणेकर चौक, सुभाष चौक, सराफ बाजारातील श्री महालक्ष्मी मंदिर येथे भजनाचा कार्यक्रम झाला.

भिलपुरा मार्गे भिलपुरा येथील संत आप्पा महाराजांचे मित्र संत लालशहा बाबा यांच्या समाधीवर श्रीराम रथाच्या सेवेकऱ्यांनी पुष्पहार अर्पण केला. रामांच्या उत्सव मूर्ती पालखीत ठेवून वाजत गाजत श्रीराम मंदिरात आणण्यात आल्या तेथे प्रभू श्रीराम चंद्रांची शेजारती करण्यात आली. रथाकरिता अवघ्या महाराष्ट्राच्या विविध भागातून अखंड असंख्य भाविकांच्या झुंडीच्या झुंडी प्रत्यक्ष पंढरीचे पांडुरंग जळगाव या भावाने दर्शनासाठी येत होत्या.

उत्सवात यांचे योगदान

या रथोत्सवाच्या यशस्वितेसाठी श्रीराम मंदिर संस्थांचे प्रमुख विश्वस्त विद्यमान गादीपती गुरुवर्य मंगेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थांचे विश्वस्त मंडळी भरत अमळकर, भालचंद्र पाटील, दादा नेवे, सुशील अत्रे, शिवाजीराव भोईटे, विवेक पुंडे व रथोत्सव समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर पाटील, दिलीप कुलकर्णी, सदस्य भानुदास चौधरी, विलास चौधरी, संजय चौधरी, सुजित पाटील, पितांबर चौधरी, राजेंद्र काळे, दिगंबर खडके, मुकुंदा पाटील, अरुण मराठे, दिलीप खडके, देवेश पाठक, उदय पाठक, देविदास बारी, मुकुंद धर्माधिकारी, नंदू शुक्ल, महेंद्र जोशी, प्रणव जोशी, विकास शुक्ल, बापू शुक्ल, सुनील शिंपी, सदाशिव तांबट, गणेश दायमा, जितेंद्र वाळके, राजेंद्र जोशी, रमाकांत जोशी, पराग जोशी ,विनायक जोशी, उदय बुवा, तानाजी बारी, केशव बारी, शंकर चौधरी, घनःश्याम चौधरी, दिलीप राजपूत, मधुकर चौधरी, योगेश कासार, संजय कोरके, सुनील पाटील, यशवंत खडके, दिनेश धांडे, गजानन फडणीस, राजू कोळी व समस्त भक्त मानकरी सेवेकरी या मंडळींनी परिश्रम घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT