Jalgaon News : वरखेडे मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येत असलेल्या तामसवाडी (ता.चाळीसगाव) पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.
अखेर याप्रश्नी आमदार मंगेश चव्हाण यांनी पुढाकार घेत तामसवाडी गावासाठी मालेगाव रोडलगत पिलखोड गावाच्या अलीकडे जागा निश्चित केल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. ( site near Pilkhod is final for rehabilitation of Tamaswadi jalgaon news)
सध्या पूर्णत्वास आलेल्या वरखेडे- लोंढे बँरेजच्या बुडीत क्षेत्रात तामसवाडी गाव येत आहे. गावाच्या पुनर्वसनासाठी शासनाच्यावतीने देण्यात येणारी शासकीय जमीन तामसवाडी ग्रामस्थांना मान्य नसल्याने त्यांनी गावासाठी पिलखोड व टाकळी प्र. दे.च्या मध्ये मालेगाव रोडलगत असणारी खासगी जमीन संपादित करून द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र याला संबंधित शेती मालकांनी असहमती दर्शविल्याने मोठा पेच निर्माण झाला होता.
कार्यालयात बैठक
तामसवाडी गाव येत आहे. गावाच्या पुनर्वसनाचा मार्ग काढण्यासाठी आमदार चव्हाण यांनी मंगळवारी (ता. ८) तामसवाडी येथील सरपंच, सदस्य, तामसवाडी पुनर्वसन समितीचे सदस्य व संबंधित शेतकऱ्यांसह महसूल, जलसंपदा, भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आपल्या कार्यालयात बोलावली होती.
चव्हाण यांनी पुढाकार घेतला
या बैठकीत दोन्ही बाजूंकडून सहमती न झाल्याने आमदार चव्हाण यांनी पुढाकार घेत सध्या नाशिक येथे पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले पिलखोड गावाचे सुपुत्र अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधून याच जागेच्या बाजूला असलेली त्यांची शेतजमीन तामसवाडीसाठी देण्याची विनंती केली. प्रश्न मार्गी लागत असल्याने अनिल पाटील यांनीदेखील होकार कळविला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
चव्हाणांकडून जागेची पाहणी
चाळीसगाव- मालेगाव रस्त्यालगत टाकळी प्र.दे. गावाच्या पुढे मन्याड ५ नंबर चारीजवळ असलेले उपनिरीक्षक अनिल पाटील यांच्या शेताच्या पाहणीसाठी आमदार चव्हाण तत्काळ अधिकाऱ्यांसह व तामसवाडी ग्रामस्थ यांच्यासोबत दाखल झाले. याठिकाणी अनिल पाटील यांची २७ एकर जमीन आहे.
या जागेची सामूहिक पाहणी केल्यानंतर ही जागा गावाच्या पुनर्वसनासाठी योग्य असल्याचे सर्वांनी आपले मत व्यक्त केले. पिलखोडजवळील जागा तामसवाडी गावाला देण्याचा मोठेपणा दाखविल्याने आमदार चव्हाण यांनी अनिल पाटील यांचे आभार मानले. विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी तामसवाडी गावाचे मुख्य रस्त्यालगतच पुनर्वसन होणार असल्याने तामसवाडी ग्रामस्थांनी आमदार चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
राज्यात मॉडेल ठरेल
यातील तांत्रिक बाबी तपासून लवकरात लवकर हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न मी वैयक्तिक लक्ष घालून करणार आहे. तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून, राज्यात मॉडेल ठरेल, असे हे पुनर्वसन करण्याचा माझा प्रयत्न राहील, असे आमदार चव्हाण यांनी सांगितले. पुनर्वसन झाल्यानंतर वरखेडे धरणाचे पाणी १०० टक्के अडविले जाणार आहे. ‘मविआ’च्या काळात बंदिस्त पाइपलाइन प्रस्ताव तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाकारल्याने हा प्रकल्प रखडला होता.
या वेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी गजेंद्र पाटोळे, वरखेडे लोंढे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस. आर. भोसले, प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, उपअभियंता कामेश पाटील, तालुका भूमि अभिलेख, कार्यालयाचे देवेंद्र राजपूत, भाजप तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, तामसवाडी सरपंच शिवदास पाटील, उपसरपंच अनिता दळवी, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र पाटील, नितीन पाटील, विठोबा पाटील, वरखडे लोंढे बॅरेज तामसवाडी पुनर्वसन समीतीचे अध्यक्ष सचिन पाटील व पोलिस पाटील किरण दळवी, धनराज पाटील, कारभारी सोनवणे, अशोक सोनवणे आदी उपस्थित होते.
"भाजप महायुतीचे सरकार आल्यानंतर त्याला पुन्हा मान्यता मिळवून आणली असून, त्याचा आराखडा देखील मंजूर झाला आहे. लवकरच यासाठी देखील निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. वरखेडे धरणाच्या पाण्याचे १९९९ पासूनचे तालुकावासीयांचे स्वप्न साकार होईल, हा मला विश्वास आहे." - मंगेश चव्हाण आमदार चाळीसगाव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.