Sakal-Exclusive esakal
जळगाव

Skilled India Mission : मुलांच्या भाषाज्ञानात वृद्धी, संख्यात्मक कौशल्यात वाढ!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शालेय विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता तिसऱ्यापर्यंत मुलभूत साक्षरता व संख्यात्मक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या

‘निपुण’ उपक्रमांतर्गत तिसऱ्या चाचणीअंती जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीस लागल्याचे सकारात्मक चित्र समोर आलेय. (Skill India Mission Increase in children linguistic knowledge increase in numerical skills jalgaon news)

नव्या शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून ‘निपुण भारत मिशन’ हे अभियान केंद्र स्तरावर राबविण्यात येत असून, त्या अंतर्गत कोरोनानंतर शालेय विद्यार्थ्यांना विविध चाचण्यांद्वारे त्यांच्यातील भाषा आणि संख्यात्मक स्तर अभ्यासला जात आहे.

शिवाय त्यासंबंधी गुणवत्तेत वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्नही केले जात आहेत. पहिल्या दोन चाचण्यांपेक्षा तिसऱ्या चाचणीचे जळगाव जिल्ह्यातील रिझल्ट चांगले आल्याने हे मिशन राबविणाऱ्या यंत्रणेनेही समाधान व्यक्त केले आहे.

वर्षभरात चार चाचण्या

इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमधील मुलभूत भाषाज्ञान, साक्षरता आणि संख्याज्ञानाची गुणवत्ता, क्षमता तपासण्यासाठी या मिशन अंतर्गत वर्षभरातून चार चाचण्या घेतल्या जातात. यात भाषा ज्ञानासाठी शब्दापासून वाक्य तयार करणे, वाक्यातील ठराविक शब्द निवडणे आदी स्तरावर क्षमता तपासली जाते. तर संख्याज्ञानही याच धर्तीवर अभ्यासले जाते.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

तिसऱ्या चाचणीचे चांगले रिझल्ट

जळगाव जिल्ह्यात तीन चाचण्या घेण्यात आल्या. पहिल्या चाचणीचे परिणाम खूपच नकारात्मक होते. अर्थात, हे मिशन आणि त्याससंबंधी चाचणी विद्यार्थीच नव्हे, तर शिक्षकांसाठीही नवीन होती. त्यामुळे ही चाचणी नकारात्मक ठरली. दुसऱ्या चाचणीत सरासरी ३४ ते ३८ टक्के विद्यार्थ्यांनी आपली क्षमता सिद्ध केली. तिसऱ्या चाचणीला जिल्ह्यातील जवळपास दीड लाखांवर विद्यार्थी प्रविष्ट झाले. पैकी ५५ ते ६० टक्के विद्यार्थ्यांनी क्षमता सिद्ध केली.

अशी होते क्षमता सिद्ध

विशेष म्हणजे या चाचणीत जे प्रश्‍न अथवा उपक्रम विद्यार्थ्यांना दिले जातात, त्यात त्यांनी १०० टक्के गुण मिळविणे आवश्‍यक असते. त्यातून त्यांची मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान क्षमता सिद्ध होते. तिसऱ्या चाचणीत ६० टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांनी पूर्ण गुण मिळविल्याचे परिणाम समोर आल्याने शैक्षणिक यंत्रणेने समाधान व्यक्त केले आहे.

काय आहे निपुण?

‘निपुण’ म्हणजे पारंगत. देशातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्यास २०२६-२०२७ पर्यंत तिसरी इयत्ता संपेपर्यंत मुलभूत साक्षरता आणि अंकगणित (संख्यात्मकता) कौशल्य आत्मसात करणे हे सुनिश्चित करणे, वाचन आणि त्यातून आकलनाची क्षमता प्रदान करणे हे ‘निपुण भारत मिशन’चे उद्दिष्ट्य आहे.

या मिशनद्वारे शालेय शिक्षणाच्या मुलभूत वर्षांमध्ये मुलांना प्रवेश देणे आणि टिकवून ठेवणे, शिक्षक क्षमतावाढ, उच्च दर्जाचे विद्यार्थी आणि शिक्षक संसाधने, तसेच शिक्षण साहित्याचा विकास, शिक्षणाचे परिणाम साध्य करण्यासाठी प्रत्येक मुलाच्या प्रगतीचा मागोवा घेणे आदी महत्त्वपूर्ण बाबी अंतर्भूत आहेत. ‘National Initiative for Proficiency in Reading with Understanding and Numeracy’ अशी इंग्रजीतील संज्ञा आहे.

"विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता त्यांच्यात भाषाज्ञान व संख्यात्मक कौशल्ये निर्माण व्हावी, म्हणून ‘निपुण’ अत्यंत उपयुक्त असे अभियान आहे. त्यातून विद्यार्थ्यांची क्षमता सिद्ध होण्यास मदत होईल." -प्रा. अनिल झोपे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण-प्रशिक्षण संस्था (डायट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT