Students participating in making lanterns in a workshop.  esakal
जळगाव

Sakal NIE : चिमुकल्या हातांनी साकारले आकाशकंदील; ‘सकाळ-एनआयई’, शिवक्रांती उद्योगसमूहातर्फे कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा

Sakal NIE : दिवाळीचे वेध साऱ्यांना लागले आहेत. यात शाळांना सुट्या लागल्याने बच्चेकंपनीचा उत्साह वाढला. काही दिवसांवर दिवाळी आल्याने घराला आकाशकंदील व आकर्षक रोषणाई लावली जात आहे.

पण, आपल्या हातांनी बनविलेले कंदील घराला लावण्याचा आनंद वेगळाच असतो. हा आनंद चिमुकल्यांनी रविवारी (ता. ५) घेत आपल्या हातांनी कंदील साकारले.(Sky lanterns made by students Sakal NIE workshop organized with Shivkranti Industry Group jalgaon news)

‘सकाळ-एनआयई’ व शिवक्रांती उद्योगसमूहातर्फे कंदील बनविण्याची कार्यशाळा रविवारी घेण्यात आली. ला. ना. सार्वजनिक विद्यालयातील ‘प्ले-ग्राउंड' परिसरात ही कार्यशाळा झाली.

यात ला. ना. विद्यालयातील कलाशिक्षक प्रेमराज सारस्वत यांनी विविध प्रकारचे आकर्षक आकाशकंदील बनवून दाखवत कंदील सोप्या पद्धतीने कसे तयार करावेत, याचे मार्गदर्शन अगदी सोप्या पद्धतीने केले. या वेळी शिवक्रांती उद्योगसमूहाचे संचालक केतन पाटील, ‘सकाळ-एनआयई’ समन्वयिका हर्षदा नाईक उपस्थित होते.

हुबेहूब साकारले कंदील

कलाशिक्षक प्रेमराज सारस्वत यांनी सांगितल्याप्रमाणे कार्यशाळेत सहभागी चिमुकल्यांनीही ते उत्कृष्टपणे साकारले. कागदाची कटाई असो की त्यांची सजावट असो, सांगितल्याप्रमाणे कृती करीत हुबेहूब कंदील साकारले. कार्यशाळेत येऊन दीपावली पर्वावर घरी लावण्यासाठी छान असे कंदील तयार केले.

उत्कृष्ट पाच कंदिलांना प्रोत्साहनपर बक्षीस

कंदील बनविण्याच्या कार्यशाळेत चिमुकल्यांनी साकारलेल्या कंदिलांचे केतन पाटील व प्रेमराज सारस्वत यांनी निरीक्षण केले. चिमुकल्यांनी साकारलेल्या कंदिलांमधून आपल्या स्वतःच्या कल्पकतेने तयार केलेल्या पाच जणांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. यात आदिती बारी, सिमरन बारी, आदित्य घोडके, तेजस पाटील व सायली भांडारकर यांना बक्षीस देण्यात आले.

''लहान मुलांसाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा अतिशय चांगली आहे. यातून मुलांना आनंद आणि काहीतरी नवीन शिकायला मिळते. यात मुलांनीही सहभाग नोंदवून चांगले असे कंदील बनविले.''- केतन पाटील, संचालक, शिवक्रांती उद्योगसमूह

''मुलांना आकाशकंदील बनविण्याचे शिकविल्यावर त्या मुलांनी खूप चांगले कंदील बनविल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहण्यास मिळाला. मुलांसाठी अशा कार्यशाळा घेऊन त्यांच्यात एक कल्पकता निर्माण होण्यास मदत होते.''- प्रेमराज सारस्वत, कलाशिक्षक

''दिवाळीच्या सुट्या असून, यात नवीन शिकायला मिळाले. सरांनीही खूप चांगल्या पद्धतीने शिकविले. आता येथे मी बनविलेला आकाशकंदील घरासमोर लावणार.''-आरव यादव, सहभागी विद्यार्थी

''आकाशकंदील बनविण्याच्या कार्यशाळेत कंदील कसा बनवायचा, हे शिकायला मिळाले. पण, आता घरी गेल्यावर येथे शिकल्याप्रमाणे नवीन चांगला कंदील बनवून त्याची सजावट करून दारी लावणार.''- यशस्वी भावसार, सहभागी विद्यार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT