Jalgaon News : तालुक्यातील रोटवद येथील मूळ रहिवासी आणि गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे सैन्यदलात कर्तव्य बजावत असताना जवान विनोद जवरीलाल पाटील (वय ३९) यांचा आकस्मिक मृत्यू झाला.
दरम्यान, शहीद जवानाची वार्ता रोटवदला धडकताच संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून शोक व्यक्त केला.(soldier martyred in road accident jalgaon news)
शहीद विनोद जवरीलाल पाटील हे रोटवद (ता. धरणगाव) येथील रहिवासी असून, गेल्या अकरा वर्षांपासून सैन्यदलात होते. सध्या गुजरात राज्यातील अहमदाबाद सैनिक दल कॅम्पमध्ये ते नवीन भरती झालेल्या जवानांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत होते.
जवान विनोद पाटील दिवाळीच्या सुट्टीत घरी आले होते. गेल्या चार दिवसांपूर्वीच परिवारासोबत ते सुरेंद्रनगर (गुजरात) येथे गेले होते. त्यानंतर ड्यूटीवर रुजू झाले. दरम्यान, शुक्रवारी (ता. १८) त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यांना गांधीनगर येथे दाखल केले.
मात्र, स्थिती नाजूक असल्याने डॉक्टरांनी ताबडतोब अहमदाबाद येथे हलविले. मात्र ऑक्सिजनची कमतरता आणि कोमात गेल्याने त्यांच्या मृत्यू झाला. त्यांनी नाशिक, पुणे, सुरेंद्रनगर येथे कर्तव्य बजावले आहे, अशी माहिती पोलिस पाटील नरेंद्र शिंदे यांनी दिली.
दरम्यान, धरणगाव तालुक्यात त्यांच्या कुटुंबातील कोणीही नाही. रविवारी (ता.१९) सकाळपर्यंत त्यांचे पार्थिव परिवारासह रोटवद येथे येईल. त्यांच्या पश्चात जवरीलाल वेलचंद शिंदे (वडील), जनाबाई शिंदे (आई), माधुरी शिंदे (पत्नी), आदित्य (मुलगा), हर्षल (मुलगा), प्रमोद शिंदे (भाऊ) असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष विनोद पाटील शहीद झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पार्थिव आज येणार
जवान विनोद पाटील यांच्यावर रविवारी (ता. १९) सकाळी नऊला रोटवद येथे शासकीय इतमातात अंत्यसंस्कार होणार आहेत. गावातून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून, संपूर्ण तयारी झाली असल्याचे पोलिस पाटील नरेंद्र शिंदे यांनी सांगितले.
सर्व गावकरी आपल्या सुपुत्राला निरोप देण्यासाठी साश्रू नयनांनी प्रतीक्षा करीत आहेत. त्यांचे पार्थिव रविवारी (ता. १९) पहाटे रोटवद येथे पोहोचणार आहे.
नियतीचा फेरा
जवान विनोद पाटील दिवाळीला घरी आले होते. त्यांनी लक्ष्मीपूजन रोटवदला केले. नंतर भावाकडे अंकलेश्वर येथे भाऊबीज करून ते ड्यूटीवर हजर झाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडली. नियतीचा फेराच त्यांना ड्यूटीवर घेऊन गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.