Praveen Patil performing conjugal prayer at Shree Vitthal temple built in America. esakal
जळगाव

Jalgaon News : सोनाळ्याच्या भूमिपुत्राने अमेरिकेत साकारले विठ्ठल मंदिर! संस्थानतर्फे न्यू जर्सित विविध उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

प्रल्हाद सोनवणे : सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील सोनाळा येथील भूमिपुत्र प्रवीण पाटील हे नोकरीनिमित्त अमेरिकेत गेले. तेथील लिंडहर्स्ट न्यू जर्सी येथे त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सुरवातीपासून पांडुरंगाची आस असलेल्या प्रवीण पाटील यांनी तेथे भव्य अशी विठ्ठल मंदिराची स्थापना केली आहे.

त्या ठिकाणी सर्वांच्या प्रतिसादाने नवनवीन धार्मिक, सामाजिक कार्यक्रम घेत असतात. तसेच मंदिराच्या पुढच्या वाटचालीसाठी काही संत व विद्वान व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे, या हेतूने त्यांनी नुकतीच आळंदी व देहू येथे भेट घेतली.

काही आश्रमांमध्ये व मंदिरांमध्ये जाऊ व अभ्यास करू, अशा हेतूने गेले, पण विठ्ठलाच्याच असीम कृपेने स्वप्नातही पाहिली नव्हती अशी दारे उघडली. (Sonala citizen pravin patil built Vitthal Mandir in America jalgaon news)

ते सांगतात, आमचे सहकारी संस्थापक मित्रवर्य भालचंद्र कुलकर्णी उर्फ भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचा विचार पुढे नेत असताना मंदिर निर्माण कार्य भव्य आणि दिव्य स्वरूपात व्हावे, यासाठी अनेक विचार त्यांच्या मनात येत असतात आणि अचानक देहू येथील कैलास महाराज मोरे देहूकर (जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज) यांच्या भेटीचा योग त्यांचे नातेवाईक वामनराव पाटील यांनी घडवून आणला.

अमेरिकेत विठ्ठल मंदिराचे कार्य होत आहे, असे कळल्यावर ते प्रसन्न झाले. त्यांनी मला स्वतः देहू परिसरात फिरवून तुकाराम महाराजांच्या स्पर्शाने पुनीत झालेली अनेक स्थळे दाखविली. आदर-सत्कार केला व त्यांना स्वतः आळंदीला घेऊन गेले. त्यांच्या आशीर्वादाने आळंदी येथील नामांकित तज्ज्ञ आणि हरिभक्त परायण मंडळींना भेटून आलो.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींच्या भेटी श्री. मोरे महाराज यांच्यामुळेच झाल्या. न्यू जर्सी या ठिकाणी विठ्ठल मंदिर उभारणी होत आहे, हे ऐकूनच या सर्व संत व विद्वानांनी खूप आनंद व्यक्त केला आणि होईल त्या पद्धतीने तन-मन-धनाने सहकार्य करण्याचे आश्वासित केल्यामुळे ते अधिकच भावूक झाले. प्रवीण पाटील हे न्यू इंग्लिश स्कूल, जामनेरचे निवृत्त मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांचे सुपुत्र आहेत.

"सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींच्या भेटीने निर्माण कार्यामध्ये खूप मोठे पाठबळ मिळाली. सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ, परम सुपर कॉम्प्युटरचे जनक पद्मभूषण डॉ. विजय भटकर, आळंदीचे भागवताचार्य तथा अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज.

आळंदीचेच गुरुवर्य किसन महाराज साखरे आणि त्यांचे सुपुत्र डॉ. यशोधन महाराज साखरे, संत-चरित्रकार प्रा. रामकृष्ण महाराज पाटील, कुलपती डॉ. विश्वनाथ कराड व माझे जामनेर येथील नातेवाईक वामनराव पाटील यांनी आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत, असे आशीर्वचन दिल्याने आमचा उत्साह शतगुणित झाला आहे." - प्रवीण पाटील लिंडहर्स्ट न्यू जर्सी अमेरिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT