Grampanchayat esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा; नवमतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करून आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने विशेष शिबिर घेतले जात आहेत.

यासाठी जिल्ह्यात ११५९ ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या विशेष ग्रामसभेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एका गावात या सभेला उपस्थित राहून मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहन दिले.( Special gram sabhas in gram panchayats for voters in district jalgaon news )

मतदारयादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जिल्हाभर राबविण्यात येत आहे. त्यासाठी मतदार प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या प्रारूप मतदार यादीतील आवश्यक दुरुस्ती व नव मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ११५९ ग्रामपंचायतीमध्ये एक ते सात नोव्हेंबर या कालावधीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.

ग्रामसभेमध्ये नागरिकांच्या माहितीसाठी प्रारूप मतदार यादीचे वाचन करण्यात आले. भुसावळ तालुक्यातील विशेष ग्रामसभेला जिल्हाधिकारी प्रसाद यांनी भेट देवून पाहणी केली.

मतदार नोंदणी, दुरुस्ती

जिल्ह्यात ४ व ५ नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रस्तरावर विशेष शिबिर घेण्यात आले. या शिबिरांमधून चोपडा विधानसभा मतदारसंघात २६७, रावेर ५२२, भुसावळ ४४४, जळगाव शहर २०४, जळगाव ग्रामीण ६७७, अमळनेर ३३२, एरंडोल १६६, चाळीसगाव ५६०, पाचोरा ५५६, जामनेर ३१२, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात १३७ नागरिकांनी मतदार नोंदणी दुरुस्ती नाव व पत्ता बद्दल वगळणी आधार जोडणीसाठी विविध नमुने भरून अर्ज सादर केले.

जिल्हाभर झालेल्या या विशेष ग्रामसभेत/शिबिरामध्ये नव मतदारसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१८, १९ तारखेस विशेष शिबिरे

पुढील टप्प्यात १८ व १९ नोव्हेंबर रोजी विद्यार्थी, महिला व दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे. २५ व २६ नोव्हेंबरला तृतीय पंथीय, महिला सेक्स वर्कर व भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्तीसाठी विशेष शिबिरे आयोजित करणेत येणार आहे.

या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदार यादीसह उपस्थित राहणार आहे. मतदारांनी आपल्या नावाच्या नोंदणीसह नावे तपासणी, वगळणे, दुरुस्ती करणे, आधार जोडणीसाठी केंद्रावर उपस्थित राहावे.

मतदार याद्या अधिक अद्ययावत करण्यासोबतच जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT