जळगाव : लॉकडाउन काळात ब्लॅकच्या दारूची तस्करी करताना गुन्हे शाखेने छापा टाकलेल्या डिस्ट्रिब्यूटरच्याच एका वाइन शॉपवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला आहे. दुकानात मुदतबाह्य बिअर आढळल्याने भरारी पथकाने कालबाह्य बिअर जप्त केली आहे. (State Excise Department takes action against Raj Wines selling expired beer in Jalgaon Latest Marathi News)
शहरातील अजिंठा चौकातील मुख्य शाखा असलेल्या वितराची रामेश्वर कॉलनी परिसरातील राज वाइन आहे. या ठिकाणी काही तरुण दुपारी बिअर पिण्यासाठी आले होते. त्यातील एका तरुणाला बिअर प्यायल्यानंतर उलटी झाल्याने त्यांनी बिअरच्या बाटलीवर बघितले असता ती मुदतबाह्य होती. त्यांनी लगेच याची तक्रार केली.
त्यानंतर जळगावच्या भरारी पथकातील सी. एच. पाटील, आनंदा पाटील, कर्मचारी दिनेश पाटील, धनसिंग पावरा, सत्यम माळी आणि मनोज मोहिते यांच्या पथकाने छापा टाकून दुकानाची झडती घेतली. त्यात त्यांना एका बिअरच्या १२४ बाटल्या आणि ५०० एमएलचे १० टीन मुदतबाह्य असल्याचे आढळून आले.
भरारी पथकाने पंचनामा करत बाटल्या जप्त केल्या आहेत. पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे आरोपपत्र पाठविणार असल्याची माहिती भरारी पथकातील सी. एच. पाटील यांनी दिली. ही कारवाई साधारण दीड तास चालली.
जुनी बिअर जीवघेणी
एरवी असे म्हटले जाते, की दारू जितकी जुनी तितकी चवीला चांगली तसेच किमतीने प्रचंड महाग असते. परिणामी दहा ते पन्नास वर्षे जुनी वाइन, विस्कीचे ब्रॅन्ड बाजारात विक्रीला उपलब्ध असतात. पिणारे अगदी तोऱ्यातच जुनी दारू खरेदी करतात. बिअरच्या बाबतीत मात्र तसे नाही. पॅकेजिंगप्रसंगीच तिच्यात अतिरिक्त co2 या गॅसचा वापर केला असतो. उघडल्यावर त्याचा हवेतील ऑक्सिजनशी संपर्क होतो. ती उघडी राहिलीच तर ऑक्सिडेशन होऊन बिअरचे विषात रूपांतर होते.
लॉकडाउनच्या आठवणी ताज्या
अजिंठा चौफुलीवरील वाइन शॉपवरून लॉकडाउनच्या काळात मद्य तस्करी करताना गुन्हे शाखेच्या पथकाने पाळत ठेवून संशयितांना अटक केली होती. त्याच संचालकांच्या कौटुंबिक सदस्याच्या नावे राज वाइन चालविले जात असल्याचा संशय पथकाला आहे. महाराष्ट्रातील मोठ्या ब्रॅन्डच्या विस्की आणि बिअरचा सप्लाय त्यांच्याकडून होत असल्याने या अनुषंगानेही तपास केला जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.