state level gang of house burglars exposed by local crime branch jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgoan Crime News : घरफोड्या करणाऱ्या राज्यस्तरीय टोळीचा पर्दाफाश; घरफोडीच्या पैशांवर कार, प्लॉट खरेदी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : नांद्रा (ता. पाचोरा) येथील शेतकरी कुटुंबातील तरुणांनी ५० वर घरफोड्या केल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माहितीवरून संशयितांवर महिनाभर पाळत ठेवत त्यांचे बिंग फोडले.

सात संशयितांपैकी चौघांना अटक केली असून, त्यांनी ३१ घरफोड्यांची कबुली दिली आहे. (state level gang of house burglars exposed by local crime branch jalgaon crime news)

नांद्रा (ता. पाचोरा) येथील अमोल चव्हाण याने २०२० मध्ये घरफोड्या आणि दरोड्यासाठी स्वतःचीच टोळी केली. नियोजनबद्ध घरफोड्यांचा सपाटा लावणारी टोळी चक्क आलिशान कार गुन्ह्यांसाठी वापरत होते. गेल्या दीड वर्षात या टोळीने जळगाव शहरात पन्नासच्या वर घरफोड्या करून लाखो रुपयांचे दागिने, रोकड लंपास केली. स्थानिक गुन्हे शाखेने एक महिना पाळत ठेवून या टोळीचा पर्दाफाश केला.

गुन्हे शाखेचे निरीक्षक किशन नजन पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक गणेश वाघमारे, अमोल देवडे, कर्मचारी करुणासागर जाधव, जयंत चौधरी, लक्ष्मण पाटील, संजय हिवरकर, रवी नरवाडे, राजेश मेंढे, सुनील दमोदरे यांनी आकाश सुभाष निकम (वय २८), महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे (३० दोघे रा. नांद्रा), सागर लक्ष्मण देवरे (२८), अमोल सुरेश चव्हाण (२९, रा. सामनेर, ता. पाचोरा) यांना अटक केली. टोळीतील जितेंद्र गोकुळ पाटील (२६), अमोल गोकुळ पाटील (२८), पवन ऊर्फ पप्पू सुभाष पाटील (२९, तिन्ही रा. मोहाडी, ता. जामनेर) अद्याप फरारी आहेत.

अमोल जळगावातील एका प्रसिद्ध सराफा पेढीवर काम करीत होता. तो प्रत्येक घरफोडीतील सोन्याच्या दागिन्यांचा रवा करवून घेत होता. नंतर मोड करून त्याचे पैसे बनवत असे. पोलिसांच्या तपासाची इत्यंभूत माहिती असलेला होमगार्ड आकाश निकम गुन्ह्यांचा प्लॅन आखत असे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सलग आठ-दहा घरफोड्या झाल्या, की कारची नंबर प्लेट व ॲक्सेसरीज बदल करण्यात येत होत्या. परिणामी, सीसीटीव्हीत दिसणाऱ्या गाडीचा पत्ताच पोलिसांना लागत नसे. सोने मोडायची पद्धत व गुन्ह्यांतील वाहनांमुळे टोळी पोलिसांच्या हाती लागली नव्हती.

घरफोड्यांची कबुली

रामानंदनगर ७, जिल्‍हापेठ ५, एमआयडीसी ३, जळगाव शहर १, तालुका १, भुसावळ बाजारपेठ १, भुसावळ शहर ३, अमळनेर २, चाळीसगाव ३, अशा ३१ घरफोड्यांची कबुली संशयितांनी दिली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

घरफोडीवर श्रीमंती

जितेंद्र व अमोल दोघे सख्ये भाऊ आहेत, तर उर्वरित सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत. आकाश निकम, जितेंद्र यांनी भूखंडही खरेदी केला आहे. घरफोड्यांसाठी पूर्वी टोळी स्वीफ्ट कार वापरत होती. नंतर अर्टिका व आता क्रेयटा कार खरेदी केली असून, गाड्या बदलून बदलून गुन्ह्यात वापर केला जात असे. या गाड्यांच्या तब्बल १४ बनावट नंबरप्लेट संशयितांकडे मिळाल्या आहेत.

मुख्यालयात पडिकाची राज्यस्तरीय कामगिरी

पोलिस खात्याने मुख्यालयात जमा केलेल्या पोलिसदादाचा छोकरा करुणासागर जाधव याने या गँगची उकल केली. माहिती दिल्यावर पथकाने चौघांना ताब्यातही घेतले. मात्र, त्यांच्याकडून गुन्हा कबूल करवून घेण्याऐवजी या कर्मचाऱ्यावरच पथक संशय घेत होते. परिणामी, थेट पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, निरीक्षक किशन नजन पाटील यांना ब्रीफ करून करुणासागर जाधव नांद्र्यात शिरला.

संशयित आकाश निकम, अमोल चव्हाण आणि जितेंद्र पाटील यांच्या घरात कुठे रोकड आहे? गुन्ह्यातील शस्त्र कुठे आहेत? इतकच काय तर घरफोडीचे दागिने आणि शस्त्र शोधून काढले. घबाड समोर आल्यावर मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने जाधव याच्या पाठीवर हात ठेवत कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT