Raksha Khadse : ‘खडसे’ आडनाव मागे आहे म्हणून माझ्या कामांचा कुठेही विचार केला जात नसेल आणि मला डावलले जात असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे, असे खळबळजनक विधान करीत खासदार रक्षा खडसे यांनी भारतीय जनता पक्षावर खुली नाराजी व्यक्त केली आहे.
मुक्ताईनगर येथे पत्रकारांशी बोलताना खासदार खडसे म्हणाल्या, की रावेर लोकसभेच्या जागेबाबत आतापासूनच एवढी रस्सीखेच का होते आहे, असा प्रश्न आपल्याला पडला आहे. (statement of Raksha Khadse about 'Khadse' surname jalgaon news )
मी पक्षाची क्रियाशील खासदार आहे. ‘खडसे’ हे आडनाव माझ्या मागे आहे, त्यामुळेच रावेर लोकसभेच्या जागेला महत्त्व आले आहे, असेही त्यांनी बोलताना सांगितले. मी पक्षांतर करणार असल्याचे माझ्यावर आरोप केले जात आहेत. मात्र, कुटुंबीय म्हणून आम्ही जरी एक असलो तरी एकनाथ खडसे यांचा पक्ष आज बदललेला आहे. माझा पक्ष वेगळा आहे.
आज कोणी कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही. तुम्ही कुठे काम केले पाहिजे, याचे महिलांना स्वातंत्र्य आहे. मला माझ्यावर पक्ष बदलण्याबाबत परिवारातून कधीच दबाव आला नाही. माझे विचार भाजपशी जुळतात आणि एकनाथ खडसे यांचे विचार राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळतात. परंतु, खडसे हे आडनाव माझ्या मागे असल्याने जर मला डावलत असतील तर हे चुकीचे आहे.
मी केवळ एकनाथ खडसे यांची सून म्हणून माझी ओळख ठेवलेली नाही, तर रक्षा खडसे हे नाव लोकांमध्ये आज पोहोचलेले आहे. कोणी माणूस महिलेच्या मागे उभा राहिला तरच ती पुढे जाऊ शकेल, हे चित्र कुठे ना कुठे बदलले पाहिजे. कुटुंबीयांची साथ निश्चित असते. मात्र, महिलांचे कर्तृत्वही तेवढेच महत्त्वाचे असते.
महिलांना आज तळागाळात काम करताना अनेक अडचणींना समोरे जावे लागते. आपण आज अनेक अडचणींचा सामना करून जनतेचे प्रश्न सोडविले आहेत. आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे केवळ माझे आडनाव न पाहता कर्तृत्व पाहून पक्ष आपल्याला आणखी पुढे येण्याची संधी देईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.