stock of unauthorized fertilizers was seized by Agriculture Department and Amravati team in jalgaon crime news esakal
जळगाव

Jalgaon Crime : भादलीत अनधिकृत खतांचा साठा; अमरावती पोलिसांसह कृषी विभागाचा छापा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : भादली बुद्रुक येथील गुदामात दडवून ठेवण्यात आलेला (नवकिसान बायो प्लांटेक लि, हैदराबाद व नवभारत फर्टिलायझर्स या कंपनीचे) अनधिकृत खतांचा साठा कृषी विभाग व अमरावती पथकाने जप्त केला आहे.

जळगाव शहरालगत झालेल्या या कारवाईमुळे कृषीविषयक औषधी, खते विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नशिराबाद पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (stock of unauthorized fertilizers was seized by Agriculture Department and Amravati team in jalgaon crime news)

जळगाव शहरापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर भादली बुद्रुक (ता. जळगाव) गावातील विकास सोसासटीच्या गुदामात अनधिकृतपणे खतसाठा असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार जळगाव जिल्हा कृषी विभाग आणि अमरावती पोलिसदलाच्या विशेष पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.

कारवाईत नवकिसान बायो प्लांटेक लि (हैदराबाद) व नवभारत फर्टिलायझर्सच्या खतांचा विनापरवाना उत्पादन, साठवणूक व विक्री करीत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी विकास अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकातील विजय पवार, जिल्हा मोहीम अधिकारी यांनी फिर्याद दाखल केली.

तपासणी पथकातील धीरज बढे, अमरावती पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील सोळंके, सहाय्यक निरीक्षक पंकज तायडे, नरेंद्र वानखेडे या तपासणी पथकाच्या सदस्यांनी गुदामात साठवणूक केलेल्या साठा जप्त करून संशयित मालाचे नमुने घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT