Strange magic of Jalgaon tehsil Sand tractor action  sakal
जळगाव

जळगाव तहसीलची अजब ‘जादूगरी’..!

भरलेले वाळू ट्रॅक्टर कारवाईप्रसंगी झाले रिकामे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : फुफणी-आव्हाणे शिवारातून अवैध वाळूउपसा सुरू असताना धरणगाव तहसीलदारांनी वाळूने भरलेले चार ट्रॅक्टर बुधवारी (ता. २) पहाटे ताब्यात घेतले. हद्द जळगाव तहसीलची असल्याने कारवाईसाठी त्यांना हस्तांतरित करण्यात आले. मात्र, तहसील कार्यालयातील काही ‘जादूगारांनी’ ट्रॅक्टर खालीच असून ते, चोरीसाठी फिरताना पकडल्याचा जावई शोध लावून कुणाला वाचविले, याचा शोध वरिष्ठांनी घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील वाळू ठेक्यांचा लिलाव झालेला नसल्याने अधिकृत उपसा पूर्णतः बंद आहे. ठेके बंद असले, की उपसा दुप्पट-तिप्पट होतो. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी वाळूचोरीला आळा घालण्यासाठी निरीक्षण पथक नेमले आहे. त्यानुसार धरणगावचे तहसीलदार नितीन देवरे व त्यांच्या टीमने फोफणी, आव्हाणे शिवारातील नदीपात्रात पहाटेच उतरून ट्रॅक्टरवर कारवाई केली. एकूण आठ ट्रक्टर नदीपात्रात होते. पथकाला पाहून पळापळ झाल्यानंतर वाळूने भरलेले चार ट्रॅक्टर पळवता न आल्याने पकडण्यात यश आले. चार ट्रॅक्टर अंधाराचा फायदा घेत पळून गेले. पकडलेले ट्रॅक्टर आणि हद्द जळगाव तहसील कार्यालयाची असल्याने ताब्यात घेतलेले ट्रॅक्टर जळगाव तहसीलकडे हस्तांतरित करण्यात आले. धरगाव तहसीलदारांनी पकडून दिलेले वाळूने भरलेले ट्रॅक्टर फुफनी-आव्हाणे येथून जळगाव कार्यालयापर्यंत पोचण्यापूर्वीच त्यातील तीन ट्रॅक्टर वाटेतच रिकामे करून खाली ट्रॉल्यांसह ट्रॅक्टर जळगाव तहसील कार्यालयात पोचले.

कायपण शक्य

जळगाव तहसीलसाठी जिल्ह्यात कायपण अशक्य नाही, बोदवड तहसीलमधील डंपरची नंबरप्लेट बदल, कारवाईनंतर चक्क डंपर बदलवण्यापर्यंत मजल गाठली असताना धरणगाव तहसीलदारांनी पकडलेल्या या ट्रॅक्टरचेही तसेच होईल. आज रिकामे असलेला ट्रॅक्टर.. नंतर गायब होऊ शकतो... नंबरप्लेट नसेल तर पासिंग झालेला ट्रॅक्टरही येऊ शकतो. नाहीतर ते शेतकऱ्याचे शेणखत वाहणारे ट्रॅक्टरही दाखवले जाईल.

दूध का दूध बाकी पानी कारवाई करणाऱ्या पथकाचे प्रमुख धरणगाव तहसीलदारांनी ‘सकाळ’शी बोलताना चारही ट्रॅक्टर वाळूने भरलेले असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. याची खात्री करण्यासाठी जळगाव तहसीलदारांना सकाळी संपर्क केला, मात्र ते नेहमीप्रमाणे व्यस्त होते. ट्रॅक्टर ताब्यात घेणाऱ्या त्यांच्या कार्यालयातील दुय्यम अधिकाऱ्याला ऑफ द रेकॉर्ड विचारणा केली तर त्याने नाही... एकच ट्रॅक्टरमध्ये वाळू आहे, बाकी तीन खालीच होते असे मखलाशी उत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT