rahul pathak esakal
जळगाव

Jalgaon News : गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून स्वीकारले पौरोहित्य; परिसरात एकमेव भटजी

अमोल महाजन

Jalgaon News : आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुण पिढी शिकून सवरून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीकडे वळते तर यापैकी काही बोटांवर मोजण्याइतकेच आपला वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसाय करणे पसंत करतात.

असाच एक ध्येयाने प्रेरित असलेल्या धानोरा (ता. चोपडा) येथील तरुण राहुल पाठक याने उच्च शिक्षण घेत छत्रपती संभाजीनगर येथे असलेली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून पौरोहित्य सुरू केले आहे.(student left job and accepted priesthood jalgaon news )

धानोरा (ता.चोपडा) येथील राहुल पाठक यांनी घरची परिस्थिती जेमतेम असताना ‘एमसीएम’ हे संगणक शिक्षण पूर्ण करून छत्रपती संभाजीनगर येथे एका मोठ्या कंपनीत २००४ मध्ये नोकरी करण्यास प्रारंभ केला. अगदी लहानपणापासून त्यांना आपल्या वडिलांकडून पौरोहित्याचे ज्ञान अवगत होते. त्यांना कंपनीत नोकरी करीत असताना गावातून पौरोहित्यासाठी वारंवार बोलावणे व्हायचे.

त्यामुळे त्यांनी कंपनीच्या गलेगठ्ठ पगाराच्या नोकरीला रामराम करीत गावातच येऊन आपला वडिलोपार्जित पौरोहित्य सुरू करण्याचा निर्णय घेतला व आज गेल्या पंधरा वर्षांपासून ते धानोरा परिसरात एकमेव असे भटजी असून, लोक त्यांच्याच हातूनच आपले विविध धार्मिक विधी, लग्न कार्यक्रम विधी आदी करून घेतात. त्यांना पौराहित्याची गुरू दीक्षा आचार्य श्‍याम शास्त्री (यावल) यांच्याकडून मिळाली आहे.

पारंपरिक वारसा ठेवला सुरू

श्री. पाठक यांनी आपला पारंपरिक वारसा पुढे सुरू राहावा म्हणून त्यांनी आपल्या मुलाचा उपनयन संस्कार देखील मोठ्या थाटात केला. त्याद्वारे त्यांनी त्यालाही अगदी लहानपणापासूनच पौराहित्याचे धडे देणे सुरू केले आहे.

महाराजही झाले डिजिटल

सद्याचे युग हे डिजिटलचे असल्याने यात पौरोहित्य करणारे भटजी बुवा देखील मागे राहिले नाहीत. ते सुद्धा आता ॲनरॉइड मोबाईलच्या सहाय्याने विविध मंत्रोपचार पठण करतात. तसेच डिजिटल जन्मकुंडली सुद्धा काढून देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bandra Kurla Complex Metro Station वर आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या 'त्या' दाव्यावर शरद पवारांचा पलटवार, म्हणाले- त्यांनी माझं स्थान ओळखलं पाहिजे

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

SCROLL FOR NEXT