Jalgaon Accident News : येथील इयत्ता नववीतील दोन विद्यार्थी व उच्च शिक्षण घेणारा एक असे तीन विद्यार्थी चोपडा येथून जिम करून घरी चहार्डीकडे परत जात असताना जुन्या चोपडा- शिरपूर रस्त्यावर चोपड्यापासून एक किलोमीटर अंतरावर अजिंक्य लॉन्ससमोर मोटारसायकल आणि बसचा अपघात झाला.
सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान हा अपघात घडला.(student was died in collision with speeding bus in Chopda jalgaon accident news)
त्यात तिघांना गंभीर दुखापत झाली. तिघांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रुपेश तुळशीराम कोळी या विद्यार्थ्यांची गंभीर परिस्थिती असल्याने त्याला शहरातीलच एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.
मात्र, त्या ठिकाणी उपचार सुरू व्हायच्या आधीच रक्तस्त्राव जास्त झाल्याने व डोक्यास मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या भीषण अपघाताची माहिती चोपडा शहरासह तालुक्यात मिळाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात गर्दी झाली होती.
चहार्डी (ता. चोपडा) येथील रहिवासी रुपेश तुळशीराम कोळी (वय १५ इयत्ता नववी), भावेश मोहन सोनवणे (इयत्ता नववी, वय १५) आणि साहिल शकील पिंजारी (वय १९) येथे मोटारसायकलीने (एमएच १९, एएस २२९०) दररोज चोपडा येथे जिमसाठी पहाटे येत होते.
नित्यनियमाने आज जिम करून परत घरी चहार्डी येथे जाताना साडेसहा ते सातच्या दरम्यान जुना चोपडा - शिरपूर रोडवर चोपड्यापासून एक किलोमीटर अंतरावर अजिंक्य लॉन्ससमोर एका ट्रकमागे मोटारसायकल चालत असताना अचानक समोरून बस आली आणि अंदाज चुकल्याने हे बसच्या मागच्या चाकाशेजारील पत्र्यावर मधोमध जोरात आदळले, त्यात दूर फेकले गेल्याने हा अपघात घडला. या अपघाताबाबत अजिंक्य लॉन्स येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने या कॅमेरामधील फुटेज पाहिल्यानंतर अपघात कसा घडला, हे समजते आहे.
चहार्डी गावावर शोककळा
या अपघातात साहिल शकील पिंजारी यासही गंभीर दुखापत झाल्याने व पाय फ्रॅक्चर असल्याने जळगाव येथे अधिक उपचारासाठी नेण्यात आले आहे. तर भावेश मोहन सोनवणे याचाही अपघातात एक पाय फ्रॅक्चर झाल्याने तो चोपडा शहरातच उपचार घेत आहे. रुपेश हा चहार्डी येथील उपसरपंच तुळशीराम धनराज कोळी यांचा मुलगा असून, या दुर्घटनेची माहिती कळताच चहार्डी गावावर शोककळा पसरली.
सकाळी अपघात झाला, त्या ठिकाणी चहार्डी येथीलच प्राथमिक शिक्षक धनराज बडगे आणि चोपडा येथील पंकज विकास पाटील व डिगंबर पाटील हे रस्त्याने जात असताना त्यांना अपघात झाल्याचे कळल्यावर यांनी या जखमी अवस्थेत असलेल्या तिघांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयात पंचनामा करण्यासाठी दाखल झाले. चोपडा शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.