Amalner: Chimurde while getting information about the work from Police Inspector Vijay Shinde. esakal
जळगाव

Student knowledge News : विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पोलिसांचे कामकाज; उन्हाळी सुटीत अनोखा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पोलिसांच्या कामकाजाबाबत लहान मुलांना नेहमीच कुतूहल असते. त्याबाबत त्यांना अनेक प्रश्‍न निर्माण होत असतात. या सर्व प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी चिमुरड्यांनी गाठले थेट पोलिस ठाण्याचे.

उन्हाळी सुटीत काहीतरी नवीन ज्ञान घ्यावे, या उद्देशाने हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. साधारणत: १२ ते १५ वयोगटातील विद्यार्थी येथील पोलिस ठाण्यात पोहोचल्याने पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी या मुलांचे कौतुक करत त्यांना सर्व कामकाज समजावून सांगितले. (Students learned about police work in unique summer vacation activity Legal lessons learned from police inspectors Jalgaon News)

‘सदरक्षणाय, खल निग्रहणाय’ असे पोलिसांचे ब्रीदवाक्य. मात्र याचा नेमका अर्थ काय्य, कोणताही गुन्हा केला तर त्याचे परिणाम काय? कायदा कलम म्हणजे काय? कोणता असे अनेक प्रश्न मुलांना पडतात.

यासाठी उन्हाळी सुटीत खेळाचे मैदान टाळून शहरातील काही लहान मुलांनी थेट पोलिस ठाण्यात भेट देण्याचा निर्णय घेतला.

यासाठी आई-वडिलांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन त्यांना मिळाले. सुरवातीला पोलिस निरीक्षकांच्या नावे त्यांनी आपल्या अक्षरात पत्र लिहून पोलिस ठाण्यात येण्याची परवानगी मागितली. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी तत्काळ परवानगी देऊन त्यांना पोलिस ठाण्यात निमंत्रित केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या मुलांमध्ये नाविन्य शेवाळे, योगेश शिंगाने, दर्शन मोरे, भाग्येश पाटील, सुशील पाटील, स्वरा पाटील यांचा समावेश होता. ही मुले पोलिस ठाण्यात पोचल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्यांना प्रत्येक विभागात नेऊन सविस्तर माहिती देण्यात आली.

पोलिस कर्मचारी सुनील जाधव यांनी मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिलीत. तसेच कारागृह आणि त्याबद्दल सविस्तर माहितीही मुलांना मिळाली.

समाधानकारक माहिती मिळाल्याने मुलांनी पोलिसांचे आभार मानले. या मुलांना अमळनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांनीही मार्गदर्शन केले.

"कायद्याचे ज्ञान जाणून घेण्याचा या मुलांचा उपक्रम कौतुकास्पद आहे. इतर मुलांनी देखील या पद्धतीचे उपक्रम राबवून जागृती निर्माण केली तर भावी पिढी गुन्हेगारीपासून मुक्त होईल."

- विजय शिंदे, पोलिस निरीक्षक, अमळनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT