जळगाव : विद्यार्थिनींनी मोबाईल हाताळताना ऑनलाइनबाबत दक्षता घ्यावी, अन्यथा दुष्परिणामांचा सामाना करावा लागेल. अनोळखी व्यक्तींशी व्हॅट्सॲप, फेसबुकवर चॅटिंग करू नये, बँकेचा क्रमांक, पीन गुपीत ठेवावा, असे आवाहन पोलिस सायबर क्राइम विभागाच्या कौन्सिलर दीप्ती अनफट यांनी रविवारी (ता. १३) येथे केले.
जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशनतर्फे डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे मुलींचे महाविद्यालयात विद्यार्थिनींना सायबर क्राइमबाबत जनजागृती व मार्गदर्शन शिबिर झाले. त्यात त्या बोलत होत्या. (Students should be careful while handling mobile phones Jalgaon Crime News)
अण्णासाहेब बेंडाळे महाविद्यालयाच्या प्रा. रत्ना महाजन, पाळधीच्या नोबेल इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका अर्चना सूर्यवंशी, बुशरा फाउंडेशनच्या अध्यक्षा बुशरा शेख, समाजसेविका छाया केळकर आदी उपस्थित होत्या.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व न्यायाधीश ए. के. शेख यांचा नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शिबिरास विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व ऑनलाइनबाबत चांगले व होणाऱ्या फसवणुकीबाबत अधिक जाणून घेतले. कौन्सिलर सचिन सोनवणे यांनीही मार्गदर्शन केले.
डॉ. शिला राजपूत यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सायली पाटील यांनी आभार मानले. मौलाना आझाद अल्पसंख्याक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी संयोजन केले. मोनाली कुमावत, शीतल सोनवणे, वैशाली कुमावत, शुभांगी कुमावत, प्रेम केळकर यांनी सहकार्य केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.