HIV Disease : आईपासून बाळाला होणारा एचआयव्ही संसर्ग रोखण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले आहे.
२०२२-२३ मध्ये ‘एचआयव्ही’सह जगणाऱ्या एकूण १५७ मातांच्या बालकांची ईआयडी कार्यक्रमांतर्गत एचआयव्ही तपासणी करण्यात आली. (Success in preventing mother to child transmission of HIV in jalgaon news )
त्यापैकी तब्बल १५४ बालकांचा एचआयव्ही अहवाल नकारार्थी आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतलेल्या बैठकीत देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. १३) जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभागाची त्रि-मासिक आढावा सभा झाली. या सभेत वर्षभरात केलेल्या पाहणी, तपासणी, उपचार आदींशी संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बाहेकर, जिल्हा एड्स नियंत्रण विभागातील कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर, डॉ. अंकित चौधरी, जिल्हा एड्स नियंत्रण विभागातील गिरीश गडे, मोहीम खान, शुभांगी पाटील, जिल्हा एड्स नियंत्रण विभागांतर्गत वेगवेगळ्या सामाजिक संस्था, समित्यांचे सर्व पदाधिकारी, सदस्य या वेळी उपस्थित होते. एड्स नियंत्रण विभागाच्या कार्यक्रमाचा आढावा घेवून आवश्यक असणाऱ्या बाबींवर या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील प्रत्येकाने आपली एचआयव्ही स्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. जे वारंवार आजारी राहतात, अशांनीही आपली स्थिती जाणून घ्यावी. अतिजोखीम गटांमध्ये तपासणी होणे गरजेचे आहे. अति जोखीम गटातील व्यक्ती व एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना शासनाचा सामाजिक लाभ उपलब्ध करून द्यावा असे आवाहनही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी या वेळी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.