Jalgaon News : आजही मुलगाच हवा अशा मानसिकतेची अनेक उदाहरण दिसून येतात. मुलाच्या जन्मासाठी अट्टाहास धरला जातो. मात्र या वृत्तीला छेद देत मुली सुद्धा वंशाचे नाव उंचावू करू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे वरणगाव येथील बनसोडे कुटुंबातील तीनही मुली.
या मुलींनी पोलिस सेवेत दाखल होऊन हम भी किसी से कम नही...हे दाखवून दिले आहे. (success story All 3 girls become policemen jalgaon news)
वरणगाव येथील सम्राटनगरातील रामचंद्र दशरथ बनसोडे (मूळ रा. सारगाव, ता. जामनेर) यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची. गावी शेती, घर नसल्याने मिळेल, त्या मजुरीवर घरखर्च भागवायचा. एकापाठोपाठ तीन मुले, तीन मुली सहा आपत्य झाली. मुलं लहान, खर्च भागत नसे. कामाच्या शोधात गाव सोडावे लागले. कामाचा शोध सुरू असताना रेल्वेत रोजंदारीवर कामसुरू केले.
मुले मोठी होत गेली, तरी पण प्रपंच चालवणे तसे कठीणच होते. मोठा मुलगा भाऊराव बनसोडे सीआरपीएफमध्ये सीमेवर असताना आई स्वर्गवासी झाली, घराची जबाबदारी आशा, उषा व निशा बनसोडे या तीन बहिणींवर आली. शिक्षण करून वडील आणि भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी समोर असताना तीनही मुली पदवीधर झाल्या.
मोठी मुलगी आशाने पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला. प्रथम पित्याच्या विरोधानंतर समाजाची चिंता सतावत होती. लोक काय म्हणतील? पोलिस खात्याबद्दल समाजात अनेक गैरसमज आहेत, ते दूर कसे करायचे, मुलींसाठी क्षेत्र योग्य असेल का, या सगळ्या गोष्टीला बाजूला करत आशा २००८ मध्ये पोलिस सेवेत दाखल झाली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
थोरल्या बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत उषा आणि निशानेही पोलिसांत भरती होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आणि २०१३ च्या पोलिस भरतीत उषाचीही शिपाईपदासाठी निवड झाली. तिच्या पाठोपाठ अथक परिश्रम करून मनात जिद्द बाळगून २०२३ ला निशा देखील पोलिसांत भरती झाली. सद्यस्थितीत आशा आणि उषा दोघा बहिणी जळगाव पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत. तर निशा नागपूर येथे पोलिस प्रशिक्षण पूर्ण करीत आहे.
गरिबीची परिस्थिती असताना आई आणि वडिलांनी दिलेले चांगल्या संस्कारामुळे एका चांगल्या ध्येयापर्यंत तिन्ही बहिणींनी शिक्षणाबरोबर ठरवलेले लक्ष पूर्ण केले. मात्र आई गेल्यानंतर वडिलांचे मन हळवे असल्याने पोलिस दलात पाठविण्याबाबत द्विधा मन:स्थिती होती. परंतु मुली खंबीर असल्याने समाजाचा विचार न करता नोकरीसाठी राजी झाले.
आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. आता वडिलांना तिन्ही मुली पोलिस खात्यात चांगल्या प्रकारे कर्तव्य पार पाडत असल्याच सार्थ अभिमान आहे. तर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी वर्गामुळे वेळोवेळी प्रोत्साहन मिळत असून, पोलिस दलात शिपाईपर्यंत कार्यरत न राहता मोठ्या पदावर जाण्याचे तिन्ही बहिणींचे स्वप्न आहे.
..अन् शिक्षणाची दारे खुली झाली
सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची दारे उघडली. त्यांनी दाखविलेल्या मार्गामुळे मुलींचे शिक्षण सुकर झाले. आता मुलींवर चांगले संस्कार घडवून त्यांच्या मनात शिक्षणाची आवड निर्माण झाली. त्यांना जगण्याचे बळ दिले. योग्य संस्कार दिले.
मात्र मुली या मुलांपेक्षा कमी नाही, या जिद्यी वरणगावच्या तिन्ही सख्ख्या बहिणींनी दाखवून दिले आहे. रामचंद्र बनसोडे यांनी कधीही मुलींबद्दल दुजाभाव केला नाही. या तिन्ही मुलींना पदवीधरपर्यंत शिक्षण दिले. चांगले संस्कार दिले. त्यामुळे आजही तीनही मुलींनी वडिलांचे नाव उज्ज्वल केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.