Chahardi : Official all-party leaders, farmers etc. started the season in the second round of 'Baramati Agro' Unit No. 4. esakal
जळगाव

Jalgaon Agriculture Update : ‘Recovery’ चांगली आल्यास ऊस दरवाढ होईल

सकाळ वृत्तसेवा

चोपडा : ‘बारामती ॲग्रो’ साखर कारखान्याकडे आतापर्यंत शिरपूर, चोपडा, भडगाव, यावल, धरणगाव, अमळनेर या परिसरातील एकूण ३६ हजार एकर उसाची नोंद करण्यात आली आहे. यावर्षी सहा ते साडेसहा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट बारामती ॲग्रोने ठेवले आहे. मार्च ते एप्रिलअखेरपर्यंत कारखाना सुरू राहील. ‘रिकव्हरी’ चांगली मिळाल्यास शेतकऱ्यांच्या उसाला दरही चांगला मिळेल, असा विश्‍वास ‘बारामती ॲग्रो’चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी व्यक्त केला.

‘बारामती ॲग्रो’च्या युनिट क्रमांक ४ च्या २०२२-२३ च्या गळीत हंगामाला गव्हाणीत उसाची मोळी टाकून प्रारंभ करण्यात आला. पहिल्या हंगामात डिसेंबरच्या शेवटी कारखाना सुरू झाला होता. मोठे मेंटेनन्स असूनही तीन लाख क्रशिंग केले होते. यंदाच्या हंगामात जवळपास सहा लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे.(Sugarcane price increase if Recovery is good Jalgaon Agriculture News)

बारामती ॲग्रोचे कर्मचारी प्रशांत कंखरे यांच्या हस्ते सपत्नीक गाळप हंगामाची विधिवत पूजा करण्यात आली. कार्यक्रमाला विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख पाटील, चोसाकाचे माजी चेअरमन ॲड. घनश्याम पाटील, चेअरमन अतुल ठाकरे, पंचायत समिती माजी सभापती कांतिलाल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य इंदिरा पाटील, तुळशीराम पाटील, माजी गटनेते जीवन चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती दिनकर देशमुख, गिरीश पाटील, रवींद्र पवार, सुनील महाजन, ललित बागूल, सूतगिरणीचे व्हाइस चेअरमन पी. बी. पाटील, शेतकी संघाचे माजी चेअरमन शेखर पाटील, माजी उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, प्रगतिशील शेतकरी भागवत महाजन, चोसाका संचालक आनंदराव रायसिंग, सुनील महाजन, नीलेश पाटील, शेखर पाटील, शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, सचिन शिंपी, विनोद धनगर आदी उपस्थित होते.

नियोजनानुसारच ऊसतोड : गुळवे

शेतकऱ्यांनी बारामती ॲग्रोच्या ठरलेल्या नियोजनानुसारच ऊसतोड होईल. शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी केले आहे. मागील वर्षापेक्षा क्रशिंग दुप्पटीने होईल. कारखान्यात नवतंत्रज्ञानाचा वापर, अत्याधुनिक सुविधा केल्या आहेत. यामुळे कारखाना एक दिवसही न बंद होता संपूर्ण दिवस सुरू राहील. ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे बॅगिंग होईल. कारखान्याची यंत्रसामग्री पूर्ण क्षमतेने चालू राहील. १७१ ट्रक, ४२२ ट्रॅक्टर जुगाड, तीन हार्वेस्टर, २२५ बैलगाडी अशी यंत्रणा सज्ज असून, या यंत्रणेमार्फत साधारणत: सात ते आठ हजार टन ऊसतोड करू शकतो, असेही गुळवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यापुढे शेतकरी करणार मोळीपूजन

शेतकरी हा कारखान्याचा केंद्रबिंदू आहे. तेव्हा मोळीपूजन शेतकऱ्यांच्या हाताने झाले पाहिजे, अशी मागणी ‘चोसाका’चे माजी चेअरमन ॲड. घनश्याम पाटील यांनी सुभाष गुळवे यांच्याकडे केली. यापुढे शेतकऱ्यांच्या हातानेच पूजा होईल, असे गुळवे यांनी सांगितले. तर उसाला २३०० रुपये प्रमाणे भाव द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली.

मोळी पूजनानंतर गाळप सुरू

कारखाना स्थापनेपासून आतापर्यंत कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदा ज्या दिवशी गव्हाण पूजन करून मोळी टाकली गेली त्याच दिवशी कारखान्याचे गाळप सुरू झाले असल्याची माहिती उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT