Bribe crime esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime : ‘महसूल दिनी’च लिपिक अडकला लाचेच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bribe Crime : रेशन कार्डवर आईचे व मुलाचे नाव कमी करण्यासाठी व नवीन रेशन कार्ड तयार करून देण्यासाठी एक हजारांची लाच मागून ती स्वीकारल्याने बोदवड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा लिपिक उमेश बळीराम दाते (वय ५५, रा. बोदवड) याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयातच अटक केली आहे. (Supply department clerk Umesh Baliram Date arrested for taking bribe jalgaon crime news)

राज्य शासनाने आजपासून महसूल सप्ताह जाहीर केला आहे. आज महसूल दिनाची अंमलबजावणी सुरू असताना बोदवड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील उमेश बळीराम दाते हा लाचेच्या जाळ्यात अडकला.

दाते याने तक्रारदाराच्या रेशन कार्डवर आईचे व मुलाचे नाव कमी करण्यासाठी व नवीन रेशन कार्ड तयार करून देण्यासाठी एक हजारांची लाच मागितली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दरम्यान, कार्यालयातच लाच स्वीकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने सापळा रचून लिपिक दाते याला अटक केली.

पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, पोलिस कर्मचारी राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT