Jalgaon News : एमआयडीसीतील कंपनी फोडून चोरट्यांनी वीजपंपासह इतर साहित्य चोरून नेल्याप्रकरणी संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त केला आहे.
प्रांजल इंड्रस्ट्रिज प्लॅस्टिक (सेक्टर- एस ११५) या दाणा बनविणाऱ्या कंपनीच्या मोकळ्या जागेतून ३६ हजार ५०० रुपयांची वीजपंप, दोन कटर व इतर साहित्य चोरट्यांनी १६ जूनच्या मध्यरात्री चोरून नेले होते.(Suspect arrested in Dana Factory theft case jalgaon crime news)
कंपनीतर्फे प्रमोद मराठे (वय ३२, रा. अयोध्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २० जूनला गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या माहितीवरून सहाय्यक फौजदार अल्ताफ पठाण, राजेंद्र कांडेलकर, सचिन पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, रवींद्र पाटील, किशोर पाटील यांनी ब्रिजेश सतीराम प्रजापती (रा. रायपूर, ता. जि. जळगाव) याला अटक केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.