Jalgaon Dengue Disease : तालुक्यातील शिरसोली येथे डेंगीसदृश आजाराची लागण झाल्याने १९ वर्षीय युवक दगावल्याच्या घटनेनंतर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. गावात आरोग्य यंत्रणेचे पथक ठाण मांडून आहे. जवळपास तेराशे घरांमध्ये तपासणी करण्यात आली असून, काही ठिकाणी डासांच्या अळी आढळून आल्या आहेत, तर सहा रुग्णांना अतितीव्र तापाची लक्षणे आहेत.
गुरुवारी (ता. १४) शिरसोलीत एका १९ वर्षीय तरुणाचा डेंगीने मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर कामाला लागली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिवसभर शिरसोली येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रक्त नमुने घेणे, तापाची तपासणी करणे याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. (System alert due rising cases of Dengue in Shirsoli jalgaon news )
तेराशे घरांमध्ये तपासणी
दिवसभर जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे पथक, तसेच जिल्हा हिवताप कार्यालयाचे पथक शिरसोली येथे ठाण मांडून होते. शिरसोली शुक्रवारी दिवसभरात वैद्यकीय पथकाने एक हजार २९७ घरे तपासली. त्यापैकी ६६ घरांमध्ये डासांच्या अळी आढळून आल्या आहेत.
सहा जणांना अतितीव्र ताप
दोन हजार २१९ कंटेनर तपासण्यात आले आहेत. तर ९५ कंटेनरमध्ये डास अळी आढळून आली आहे. सहा रुग्णांना तापाची लागण आढळून आली आहे. तर अतितीव्र ताप असलेल्या पाच रुग्णांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.
तालुक्यातील शिरसोली येथे डेंगीसदृश आजाराची लागण झाल्याने १९ वर्षे युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर येताच, जिल्हा परिषदेचे प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिले आहेत.
पथक दिवसभर गावातच
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी वैद्यकीय अधिकारी, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक दिवसभर शिरसोली येथे ठाण मांडून होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण गावात रक्त नमुने गोळा करण्याचे काम सुरू होते.
त्यासोबतच जनजागृती करणे, तसेच डेंगीपासून सावध राहण्यासाठी करावयाच्या उपायोजनांच्या सूचना ग्रामस्थांना दिल्या जात होत्या. याबरोबरच डेंगीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेला कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांतर्फे शिरसोली येथील ग्रामस्थांना करण्यात आले.
व्यापक सर्वेक्षण सुरू
शिरसोली येथे एक प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चार समुदाय आरोग्य अधिकारी, तसेच आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आरोग्य पर्यवेक्षक याबरोबर अशा, स्वयंसेविकांच्या मदतीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यासोबत जिल्हा हिवताप कार्यालयाचे एक पथक देखील शिरसोली येथे ठाण मांडून असून, कीटक शास्त्रीय संशोधन त्यांच्याद्वारे सुरू करण्यात आले आहे.
साथ रोग पथकदेखील शिरसोली येथे ठाण मांडून असून, तापसदृश रुग्ण शोधण्याची मोहीम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहे. प्रशासन संपूर्णपणे अलर्ट मोडवर असून, डेंगीसदृश आजाराला आळा घालण्याच्या दृष्टीने प्रशासनातर्फे सर्व प्रकारची उपाययोजना केली जात असल्याने ग्रामस्थांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.