party leader Sharad Pawar, present at the meeting along with Senior leader Eknath Khadse Jayant Patil, Adv. Rohini Khadse, Adv. Ravindra Patil etc.  esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्ह्यातील 2 लोकसभा राष्ट्रवादीकडेच घ्या; शरद पवार यांच्याकडे पदाधिकाऱ्यांची चर्चेत मागणी

जळगाव व रावेर लोकसभेबाबत सोमवारी (ता.८) मुंबईत पक्षाचे नेते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यातील जळगाव व रावेर हे दोन्ही मतदार संघ महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसकडेच घेण्यात यावेत, त्यात रावेर लोकसभा मतदार प्राधान्याने पक्षाकडेच ठेवावा, अशी मागणी जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे नेते शरद पवार यांच्यासोबतच्या चर्चेत केली. (Take 2 Lok Sabha from district to only NCP office bearers demand to Sharad Pawar at meeting Jalgaon political News)

जळगाव व रावेर लोकसभेबाबत सोमवारी (ता.८) मुंबईत पक्षाचे नेते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. जे पदाधिकारी मुंबईत उपस्थित नव्हते, ते झूम च्या माध्यमातून सहभागी झाले होते.

यावेळी जळगाव व रावेर लोकसभेबाबत चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीचे लवकरच जागा वाटप होणार आहे. त्यात दोन्ही लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीकडेच घेण्यात यावे, असा आग्रह सर्वच पदाधिकाऱ्यांनी केला. त्यांनी मागील लोकसभेच्याबाबतची माहितीही दिली.

तसेच जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघाची स्थितीचीही माहिती दिली, रावेर लोकसभा मतदार संघ प्राधान्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असावा, असा आग्रह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केला.

मुंबई येथील बैठकीस ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष रोहिणीताई खडसे खेवलकर, जिल्हा अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर , महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, माजी आमदार दिलीप सोनवणे, उमेश पाटील, रिंकू चौधरी इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

झुममिटींगद्वारे माजी मंत्री अरुणभाई गुजराथी, डॉ. सतीश पाटील, दिलीप वाघ, राजीव देशमुख, संतोष पाटील, डॉ. सुरेश पाटील, तिलोत्तमा पाटील, रिताताई बाविस्कर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT