MP Raksha Khadse speaking in a meeting with the officials of the National Highway Authority at the Collector's office esakal
जळगाव

SAKAL Impact: तळोदा-बऱ्हाणपूर महामार्ग रावेरकडून जाणार; जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निर्णय

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद उपस्थित होते.

सकाळ वृत्तसेवा

रावेर : तळोदा- बऱ्हाणपूर हा नियोजित चौपदरी राष्ट्रीय महामार्ग सावदा, रावेर शहराजवळून आणि तालुक्याच्या पूर्व भागातूनच जाईल, अशी निःसंदिग्ध ग्वाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता.५) जळगाव येथे दिली.

खासदार रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्याने येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत या विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा रस्ता मुक्ताईनगर तालुक्यातून न वळवता मूळ मार्गाने रावेर तालुक्यातूनच नेण्याचे मान्य केल्याचे खासदार खडसे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले. (Taloda Barhanpur highway will pass through Raver decision taken at meeting held at Collectors office SAKAL Impact jalgaon)

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद उपस्थित होते.

त्यांच्यासोबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (न्हाई) नागपूरचे क्षेत्रीय अधिकारी आशिष असाटी, भोपाळ येथील क्षेत्रीय अधिकारी राकेश सिंग, जळगावचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार आणि सोहनी, चंदन गायकवाड आदी उपस्थित होते.

बैठकीत खासदार खडसे यांनी हा राष्ट्रीय महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून न वळवता रावेर शहराजवळून व तालुक्याच्या पूर्व भागातून नेण्याची मागणी केली. याबाबतचे फायदे त्यांनी अधिकाऱ्यांना पटवून दिले.

यावर अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी मान्य केली. लवकरच नव्या मार्गाचा प्रस्ताव तयार करून आगामी दोन -तीन महिन्यातच ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिले.

दरम्यान, खासदार खडसे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले, की हा प्रस्ताव तयार केल्यानंतर पुन्हा जळगाव येथे या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी आपण पुढाकार घेऊ व हा नियोजित राष्ट्रीय महामार्ग रावेर शहराजवळून तालुक्याच्या पूर्व भागातूनच जाईल, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

‘सकाळ’चा पाठपुरावा अन् अभिनंदन

हा नियोजित चौपदरी राष्ट्रीय महामार्ग रावेर शहरासह पूर्व भागातून जाणार असल्याची माहिती खासदार खडसे यांनी देताच असंख्य जागरूक नागरिकांनी फोन करून ‘सकाळ’ चे अभिनंदन केले.

‘सकाळ’ ने सर्वप्रथम १२ डिसेंबरला हा राष्ट्रीय महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून जाणार असल्याचे व सावदासह रावेर शहराला वगळल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली व रक्षा खडसेंना त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले.

‘सकाळ’ने त्यानंतरही या विषयाचा पाठपुरावा करीत १५ सविस्तर बातम्या प्रसिद्ध केल्या. हा रस्ता रावेर व पूर्व भागातूनच जावा, यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे व नेत्यांचे म्हणणे ‘सकाळ’मधून मांडले व हा विषय लावून धरला.

यासाठी बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांनी सर्वपक्षीय समितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन केले. त्याचबरोबर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष आणि श्रीराम फाउंडेशन यांनीही वेळोवेळी मागण्या करून या प्रश्नाचा पाठपुरावा केला होता.

दरम्यान, याबाबतचे भूसंपादनाचे नवे पत्र प्राप्त होईपर्यंत ‘सकाळ’ने या प्रकरणाचा असाच पाठपुरावा सुरू ठेवावा, अशी अपेक्षाही वाचकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT