esakal
जळगाव

Jalgaon Water Scarcity : चाळीसगावच्या 11 गावांमध्ये टँकर सुरु; 14 पैकी अकरा प्रकल्पांमध्ये ठणठणाट

दीपक कच्छवा

Jalgaon Water Scarcity : चाळीसगाव तालुक्यात या वर्षी पुरेशा पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य पाहता, तालुक्यातील १४ मध्यम व लघु प्रकल्पांपैकी केवळ तीनच प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

अकरा प्रकल्पांमध्ये आजही ठणठणाट आहेत. याशिवाय २२ खेड्याचे तारणहार असलेल्या ‘मन्याड’ धरणात केवळ एक टक्के जलसाठा आहे.

त्यामुळे यावर्षी अनेक गावांना टंचाईची दाहकता सोसावी लागणार आहे. त्यादृष्टीने आतापासूनच टंचाई निवारणार्थ प्रशासनाने नियोजन करावे, अशी मागणी होत आहे. (Tanker water supply started in 11 villages of Chalisgaon jalgaon news)

तालुक्यातील मन्याड धरणाचा परिसरातील जवळपास ३० गावांना फायदा होता. ‘मन्याड’च्या पाण्यावर परिसरातील शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षे गहू, हरबरा आणि भुईमुंग आदी पिके घेतात. जेव्हा या धरणात शंभर टक्के जलसाठा असतो, तेव्हा मन्याडचा परिसर समृद्धीने नटलेला असतो. यावर्षी मात्र पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने केवळ एक टक्क्यावर धरणातील पाणीसाठा आहे.

यंदा या धरणात पाणी नसल्याने त्याचा फटका २२ खेड्यांना बसण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे रब्बी हंगामही शेतकऱ्यांच्या हातातून जाणार असल्याने शेतकरी आतापासूनच चिंतातूर झाले आहेत. यावर्षी ऑक्टोबर उजाडला तरीही गिरणा नदीला एकही पावसाच्या पाण्याचा पूर गेलेला नाही. तालुक्यातील १४ लघु प्रकल्पांपैकी खडकीसीम, वाघले- १ व २ हेच प्रकल्प शंभर टक्के भरले असून कृष्णापुरी प्रकल्प ६४ टक्के झाला आहे.

हातगाव-१, पिंप्री उंबरहोळ, ब्राह्मणशेवगे, पिंपरखेड, कुंझर-२, बोरखेडा, वलठाण, राजदेहरे, देवळी-भोरस व पथराड या प्रकल्पांमध्ये पाण्याचा एक थेंबही उपलब्ध नाही. तालुक्यात अद्यापही पाहिजे तसा दमदार पाऊस झालेला नाही.

यामुळे आजही अकरा लघु प्रकल्पात ठणठणाट आहे. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे गिरणा धरणात ५७ टक्के जलसाठा आहे. या साठ्यामुळे चाळीसगाव शहराचा तसेच गिरणा नदीवर अवलंबून असलेल्या काही गावांचा पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न मिटला आहे.

अकरा गावांमध्ये टँकर सुरु

चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव, हातगाव, विसापूर तांडा, अंधारी, करजगाव, कृष्णानगर, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे व ब्राह्मणशेवगे अशा ११ गावांमध्ये ११ टँकर सद्यःस्थितीत सुरू आहेत. याशिवाय जुनोने व ब्राह्मणशेवगे या दोन गावांमध्ये विहीर अधिग्रहीत केल्या आहेत. दोन दिवसात आणखीन काही गावांमध्ये टँकरची संख्या वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी घोडेगाव, हातगाव येथील भिल्ल वस्तीतील रहिवाशांनी केली असल्याचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होणार असल्याचे चित्र दिसत असल्याने पंचायत समिती प्रशासनाकडून आतापासूनच उपाययोजना करण्याचे नियोजन सुरु केले आहे.

"आपल्या तालुक्यात आजही दर दिवसाला चार ते साडेचार लाख लिटर पाणी लागत आहे. सध्या ज्या ज्या भागात पाण्याची टंचाई आहे, त्या भागात आम्ही स्वतः जाऊन पाहणी करत आहोत. पाण्याच्या ज्या काही जुन्या विहिरी आहेत, त्यांची पाहणी करुन त्या पुन्हा वापरात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत." - नंदकुमार वाळेकर, गटविकास अधिकारी : चाळीसगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT