Jalgaon News : नगरदेवळा गट ग्रामपंचायत अंतर्गत संगमेश्वर येथे जिल्हा परिषदेची मराठी शाळा असून, १९६५ पासून येथे एक ते चार वर्ग भरतात. या शाळेत दोन शिक्षक अध्यापनाचे कार्य करतात. शाळेची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होती.
परंतु गेल्या दोन महिन्यांपासून शाळेत निपाणे येथून नव्याने रुजू झालेले शिक्षक दीपक हिरे यांनी संगमेश्वर ग्रामसमितीच्या होतकरू तरुणाईला सोबत घेत व नगरदेवळा गट ग्रामपंचायतीच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविल्याने दोन महिन्यात शाळेचे रुप पालटले आहे. (Teacher Deepak Hire has digitized zp school in collaboration with group Gram Panchayat jalgaon news)
शाळा म्हणजे विद्येचे माहेरघर असून, तेथे प्रफुल्लित वातावरण असले तर सरस्वती वास केल्याशिवाय राहात नाही. मात्र, त्याला बळ लागते उमद्या अन् होतकरू गुरुवर्यांचे. याचाच प्रत्यय येथे दृष्टीस पडत आहे. येथे नव्याने रुजू झालेले शिक्षक दीपक हिरे यांनी शाळा व परिसराची स्वच्छता करण्यास सुरुवात केली.
ते बघून तरुणाई देखील सरसावली. त्यांनी देखील त्यांच्या परिने सहकार्य करत वस्तू स्वरुपात मदत करून शाळेला रंगरंगोटी केली. गट ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शाळा डिजिटल केली आहे. विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचा विडाच उचलला असल्याने संगमेश्वर येथील जिल्हा परिषद शाळा खऱ्या अर्थाने नावारुपाला येत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
आपली शाळा सर्वदूर परिचित व्हावी, त्या दृष्टीने हवे ते सहकार्य करण्याचे आश्वासन अध्यक्ष वैशाली पाटील, महेश पाटील, पोलिस पाटील, विनोद पाटील, संदीप पाटील, शेखर पाटील, ललित पाटील, सर्जेराव पाटील, वाल्मीक पाटील, दादाभाऊ निकुंभ, अंकुश भील, अरुण पवार समिती सदस्य, ग्रामस्थांनी दिले आहे. याप्रसंगी सुवर्णा पाटील, राजेंद्र पवार, बापू चौधरी, राजेंद्र महाजन, महेश पाटील, किरण काटकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचलन व आभार अमोद पाटील यांनी मानले.
चौदाव्या वित्त आयोगातून सुविधा
दिव्यांगांसाठी ट्रेक, फ्रीज, स्मार्ट टीव्ही, टेबल, फॅन, होम थिएटर, प्रिंटर फिटिंग, व्यासपीठ, परसबाग, शाळेच्या छताचे काम आदी ग्राम समितीच्या सहकार्याने झाले असून, गट ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातून प्रसाधनगृह, हॅडवाश स्टेशनचे भूमिपूजन सरपंच प्रतीक्षा काटकर यांचे हस्ते करण्यात आले आहे. याप्रसंगी स्मार्ट टीव्ही, कॉम्प्युटर, प्रोजेक्टर शाळेला सुपूर्द केले असल्याचे दीपक हिरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.