Jalgaon News : नरवाडे- विरवाडे रस्त्यावर असलेल्या शेतात शुक्रवारी (ता. २७) सुनीता सखाराम बारेला (रा. नरवाडे) ही १३ वर्षीय आदिवासी मुलगी काम करताना तिला विषारी सापाने दंश केला. मुलगी लागलीच बेशुद्ध झाली होती.
या वेळी वडती माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक जगदीश रघुनाथ पाठक हे देवदूतासारखे धावून आले. ते दुचाकीने विरवाडे येथे प्रशिक्षणासाठी जात असताना त्यांनी ही घटना पाहिली. प्रशिक्षण बाजूला ठेवत मुलीचा जीव महत्त्वाचा मानून तिला तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व तिचे प्राण वाचविले. (teacher saved life of girl from snake bite jalgaon news)
नरवाडे - विरवाडे रस्त्यावर असलेल्या शेतात काम करताना सुनीता बारेला या आदिवासी मुलीला पायास दोन ठिकाणी विषारी सापाने (नाग) सर्पदंश केल्याने मुलगी बेशुद्ध होऊन पडली. तिच्या शेजारी नातेवाईक रडत होते. मदतीची हाक मारत होते. अशा वेळी देव तारी त्यास कोण मारी. या उक्तीप्रमाणे वडती माध्यमिक विद्यालयातील शिक्षक जगदीश पाठक हे दुचाकीने विरवाडे येथे प्रशिक्षणासाठी जात असताना त्या मुलीसाठी देवदूत म्हणून धावून आले.
जगदीश पाठक यांनी तिची बेशुद्ध अवस्था पाहिली. पायांवर दंश केलेले मोठे व्रण पाहिले. लागलीच तिच्यावर प्रथमोपचार करीत दोन्ही पायांच्या वरील बाजूस घट्ट कापड बांधून क्षणाचाही विलंब न करता तिच्या एका नातेवाईकास सोबत घेऊन उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. पवन पाटील यांनी पाऊण तास तिच्यावर व्यवस्थित उपचार केले.
पण तिची अवस्था अतिशय गंभीर होत चालल्याने तिला तत्काळ पुढील उपचारासाठी खासगी वाहनाने जळगाव येथे सामान्य रुग्णालयात पाठविले. डॉ. चंद्रकांत बारेला यांनीही मदत केली. चोपडा येथे योग्य ते उपचार मिळाल्याने ती जळगाव येथे व्यवस्थित पोहचली.
...अन् माणुसकी आली धावून
धावपळीच्या जगात दुसऱ्यासाठी वेळ देत माणुसकी दाखवत स्वतःच्या वाहनाने जीवघेणा प्रवास करीत अशा कठीण प्रसंगी अनोळखी माणसाच्या परिवाराच्या मागे उभे राहण्यासाची इच्छाशक्ती लागते. ती पाठक यांनी दाखवली म्हणून शिक्षक हा केवळ शैक्षणिकच काम करीत नाही तर सामाजिक जबाबदारी देखील मनापासून पूर्ण करतो, हेच या कठीण समयी अधोरेखीत झाले.
एक प्रकारे देवदुताचे कार्य केल्याने आज तिचे प्राण वाचले असून तिची तब्येत ठणठणीत असल्याचे पाठक यांनी सांगितले. योग्य वेळी योग्य त्या काळात आदिवासी मुलीला उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले. यामुळे ग. स. संचालक योगेश सनेर यांच्यासह मित्र परिवाराने पाठक यांचा गौरव केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.