Transfer News esakal
जळगाव

Teacher Transfer : शिक्षकांच्या सहाव्या टप्प्यातील बदल्या रद्द होणार? हालचाली गतिमान

सकाळ वृत्तसेवा

Teacher Transfer : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सहाव्या टप्प्यातील बदल्या रद्द करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनीही त्यास सकारात्मक दुजोरा दिला आहे.

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्यात आल्या. या बदल्या करताना वेगवेगळ्या टप्पे करण्यात आले. (teachers transfer in sixth phase will be cancelled jalgaon news)

पाचव्या टप्प्यापर्यंतच्या बदल्या होतील, असे अगोदर नियोजन करण्यात आले. त्यानुसार राज्यातील सर्वच प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या पाचव्या टप्प्यापर्यंत त्यांना अपेक्षित ठिकाणी आणि नजीकच्या शाळेवर सोयीने झाल्या आहेत.

बदलीचा सहावा टप्पा

प्राथमिक शिक्षकांच्या बदलीतील सहावा टप्पा अडचणीचा ठरला. शासनाच्या यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार ५३ वर्षांवरील कोणत्याही शिक्षकाची बदली होणार नाही, असे स्पष्ट आहे. असे असतानाही सहाव्या टप्प्यात ५३ वर्षांवरील तथा विविध आजार असणारे पती-पत्नी एकत्रीकरण या सर्व नियमांना फाटा देत बदल्या करण्यात आल्या.

यातील ज्येष्ठ शिक्षकांना सोयीच्या बदल्या देण्याऐवजी त्यांना अतिदुर्गम भागात गैरसोयीच्या अनेक शिक्षकांना दोन ते पाच किलोमीटरपर्यंतची पायी जाणे, अशाप्रकारे बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे सहाव्या टप्प्यांतर्गत ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या, अशा राज्यातील सुमारे पाच हजारांवर शिक्षक नाखुश झाले आहेत. त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबत राज्य पातळीवर शिक्षक संघटनांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची नुकतीच भेट घेतली. मंत्री केसरकर यांनी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना आश्वासन दिले, की सहाव्या टप्प्यातील बदल्या रद्द करण्यात येतील.

या बदल्या रद्द करण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाचे धोरण आहे. त्यानुसार आपण ग्रामविकास विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करू, तसेच बैठकीत बदल्या रद्द करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.

यासंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी स्पष्ट केले, की सहाव्या टप्प्यातील बदल्या रद्द करण्याचे नियोजन आहे. नजीकच्या कालावधीत त्याबाबत निर्णय घेतला जाईल.

सहाव्या टप्प्यात ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत, ते सर्वच शिक्षक विविध पातळीवर न्यायालयात याचिका दाखल करून आहेत. प्रशासकीय पातळीवर कुठलाही निर्णय घेतला जात नसल्यामुळे शिक्षकांमध्ये अधिकच अस्वस्थता निर्माण झाली आहे.

नागपूर जिल्हा परिषद

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्षकांच्या याचिकेवर निर्णय देताना यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, कोणावर अन्याय होऊ नये, असे आदेश दिले.

त्या आदेशाचे पालन करून नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सहाव्या टप्प्यात झालेल्या बदल्या रद्द करण्याचे आदेश पारित केले आहेत.

त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही सर्वत्र बदल्या रद्द व्हाव्यात, अशी मागणी शिक्षक संघटनांची आहे. विशेष म्हणजे मंत्री केसरकर आणि मंत्री महाजन यांनीही त्यास सकारात्मक दुजोरा दिल्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदेच्या सहाव्या टप्प्यातील झालेल्या बदल्या रद्द करण्याच्या हालचालींना वेग आला असून, येत्या आठवड्यात या बदल्या रद्द होण्याचे आदेश पारित होण्याची शक्यता आहे.

"शिक्षक प्रतिनिधींनी भेट घेतली. त्यावेळी राज्यातील सहाव्या टप्प्यातील शिक्षकांच्या झालेल्या बदल्या रद्द करण्याबाबत त्यांना सांगितले आहे. याबाबत लवकरच ग्रामविकास विभागाशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल." -दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

"शिक्षण मंत्री केसरकर यांनी दिलेल्या आश्वासनानुसार निश्चितच सकारात्मक विचार केला जाईल. राज्यातील सहाव्या टप्प्यातील शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात येतील. याबाबतचा निर्णय नजीकच्या कालावधीत घेतला जाईल." -गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT