Sessions Chief Justice distributing Ayurvedic saplings in the 'Har Ghar Kisan' campaign of Greencity Foundation, Hirvankur Foundation and Bar Association. M. Q. S. M. Sheikh esakal
जळगाव

Jalgaon News : टीम हिरवांकुरची ‘हर घर किसान’ मोहीम; शहर होणार पुन्हा सुंदर, स्वच्छ

ग्रीनसिटी फाउंडेशन, हिरवांकुर फाउंडेशन (नाशिक) व बार असोसिएशनतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘हर घर किसान’ या मोहिमेला सुरवात झाली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील ग्रीनसिटी फाउंडेशन, हिरवांकुर फाउंडेशन (नाशिक) व बार असोसिएशनतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘हर घर किसान’ या मोहिमेला सुरवात झाली. जिल्ह्याचे प्रमुख व सत्र सरन्यायाधीश एम. क्यू. एस. एम. शेख यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ झाला.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ए. पी. सय्यद, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष केतन ढाके, नूतन अध्यक्ष रमाकांत पाटील, न्यायाधीश, विधिज्ञ, वकील, अधिकारी, सेवकवृंद, टीम ग्रीनसिटी व टीम हिरवांकुरचे सदस्य उपस्थित होते.(Team Hirvankurs Har Ghar Kisan campaign jalgaon news)

पूर्वीचे सुंदर, हिरवेगार जळगाव शहर आता प्रदूषणाने ग्रासली आहे. शहराचे तापमान रोज उच्चांक गाठत आहे. यावर केवळ चर्चा न करता कृती करू या, असे प्रतिपादन हिरवांकुरचे संस्थापक अध्यक्ष निलयबबू शाह यांनी केले.

आपण सर्वांनी आपले शहर पूर्ववत स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त करण्यासाठी मनापासून प्रयत्न करू, अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष व टीम ग्रीनसिटी जळगावचे संस्थापक अध्यक्ष विजय वाणी यांनी दिली.

वसंत पाटील यांनी संकल्पनेविषयी माहिती दिली. राखी शाह यांनी अमृतकाल पंचक्रोशीची शपथ दिली. डॉ. कंचन वाणी, संतोष क्षीरसागर, माजी अभियंता जाधव, दानवी लाकडे, वनश्री लाकडे, मंजिरी गावित आदी उपस्थित होते. कृष्णा सपकाळे, निनाद पाटील यांनी आभार मानले.

अशी आहे संकल्पना

या संकल्पनेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला आयुर्वेदिक व दुर्मिळ वृक्षाचे रोप दत्तक म्हणून दिले गेले. दत्तक घेतलेल्या या रोपाला प्रत्येकाने येत्या जूनपर्यंत एखाद्या बाळाप्रमाणे सांभाळून सशक्त बनवायचे आहे.

त्यानंतर त्याच बाळराजाचे आपल्या शहरात मध्यवर्ती ठिकाणी एका सुंदर उत्सवाचे आयोजनात वृक्षारोपण करावयाचे आहे. विशेष म्हणजे त्या वृक्षाला दत्तक घेणाऱ्या व्यक्तीचे पालक म्हणून नाव देण्यात येईल. त्या वृक्षाचा बारकोडसुद्धा देण्यात येईल.

त्या बारकोडमध्ये त्या वृक्षाची संपूर्ण माहिती व दत्तक घेणाऱ्याचे नाव अंकित केले जाईल. हे नाव १००, २००, ५०० वर्षांपर्यंत त्या झाडासोबत राहील. या संकल्पनेसाठी बाळरोप व त्याचा सांभाळ करण्याचे संपूर्ण मार्गदर्शन टीम ग्रीनसिटी व टीम हिरवांकुर निःशुल्क प्रदान करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT