crime news esakal
जळगाव

Jalgaon News : भुसावळला 500 किलो गांजा पकडला; LCBची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ (जि. जळगाव) : येथील जॉली पेटोलपंपाजवळील उड्डाणपुलाखाली जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने सापळा रचून एका वाहनातून पाचशे किलो गांजा पकडला असून, ९४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (team of LCB laid trap seized 500 kilos of ganja from a vehicle confiscated goods worth 94 lakhs jalgaon crime news)

ही कारवाई गुरुवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी शुक्रवारी (ता. १०) रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, पोलिसांनी मालेगाव येथून एकास ताब्यात घेतले आहे.

एका वाहनात गांजा भरून येत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक नजन पाटील यांच्या आदेशावरून भुसावळ शहरात जळगाव रस्त्यावर गुरुवारी (ता.९) रात्री सव्वादहाच्या सुमारास पथकाने सापळा रचला.

दरम्यान, जॉली पेट्रोल पंपाजवळील उड्डाणपुलाखाली या वेळी संशयित वाहन आढळून आले. पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता त्यात गांजा आढळून आला. पथकाने वाहनातील ५०० किलो गांजा ताब्यात घेऊन कारवाई करून ९४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

भुवनेश्वर येथून इलेक्ट्रिक साहित्य घेऊन एक आयशर ट्रक (एमएच १५, एचएच ६९९४) नाशिक येथे वितरणासाठी जात असल्याची गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नजन पाटील यांनी गुरुवारी (ता.९) रात्री पथक भुसावळला रवाना केले.

पथकातील अनिल जाधव, कलमाकर बागूल, अनिल देशमुख, श्रीकृष्ण देशमुख जळगाव रस्त्यावरील जॉली पेट्रोल पंपाजवळ तळ ठोकून होते. रात्री जळगाव रोडवरील उड्डाणपुलाखाली एक आयशर ट्रक बराच वेळ थांबून होता. पथकाला संशय आल्याने ट्रकची तपासणी केली असता त्यात चालक नव्हता.

पथकाने याबाबत अधिकाऱ्यांना कळविले. घटनास्थळी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक नजन पाटील यांनी शुक्रवारी (ता. १०) दुपारी दोनच्या दरम्यान भेट दिली. हा संशयित ट्रक तालुका पोलिस ठाण्यात लावण्यात आला आहे.

ट्रकमध्ये गांजाच्या १६ बॅग पाच किलो वजनाचे अठ्ठेचाळीस गठ्ठे (एकूण पाचशे किलो ६०० ग्रॅम) असा एकूण ७५ लाख रुपयांचा गांजा, नऊ लाखांचे इलेक्ट्रिक साहित्य तसेच दहा लाख रुपयांचा ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

वाहनातील चालकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, सचिन महाजन, प्रमोद लाडवंजारी, अक्रम शेख यांनी मालेगाव येथून ताब्यात घेतले असून, पथक नाशिककडे रवाना झाले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक नजन पाटील, अमोल देवडे, सुनील दामोदर, ईश्वर पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT