dahihandi Sakal
जळगाव

Krishna Janmashtami : दहीहंडी फोडण्याचा मान यंदाही तरुणींच्या पथकास; जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाउंडेशनचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

Krishna Janmashtami : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाउंडेशन यांच्यातर्फे गुरुवारी (ता. ७) सायंकाळी साडेपाचपासून काव्यरत्नावली चौकात तरूणींची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे.

महोत्सवात दहीहंडी फोडण्याचा मान महिला गोविंदा पथकाला देण्यात येणार आहे. ( team of young women will break dahi handi this year as well in jalgaon news)

एनसीसी, नुतन मराठा महाविद्यालय, ॲड. बाहेती महाविद्यालय, विद्या इंग्लीश स्कूल, मूळजी जेठा महाविद्यालय हे पाच पथक दहीहंडी फोडण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहेत. विवेकानंद व्यायाम शाळेतर्फे मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.

२७५ जणांचे ढोलताश पथक

यासह शिवतांडव व शौर्यवीर या दोन्ही ढोल-ताशा पथकातील सुमारे २७५ वादक आपल्या कलेची प्रस्तुती देणार आहेत. मल्लखांब प्रशिक्षक नरेंद्र भोई यांच्या मार्गदर्शनाखाली २० विद्यार्थी रोप मल्लखांब, पोल मल्लखांबचे चित्तथरारक सादरीकरण करणार आहेत.

अनुभूती शाळा, जी. एच. रायसोनी पब्लीक स्कुल, रूस्तमजी इंटरनॅशनल, किडस् गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल, इपिक डान्स स्टुडिओतर्फे सांस्कृतिक नृत्य सादर केले जाणार आहे. ५ ते १२ वर्ष वयोगटातील बाळगोपाळांसाठी राधा-श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धाही होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दहीहंडी उत्सवाच्या अध्यक्षा संस्कृती नेवे, उपाध्यक्षा मेघना भोळे, यामिनी कुळकर्णी, सचिव पियुष तिवारी, सहसचिव हर्षल मुंडे, खजिनदार अर्जुन भारूळे, सागर सोनवणे, शुभम पुश्‍चा, प्रितम शिंदे, तृषांत तिवारी, पियुष हसवाल, प्रशांत वाणी, राहूल चव्हाण, पियुष तिवारी, यश राठोड यांच्यासह सदस्य संयोजन करत आहेत.

तरुणींच्या पाच पथकांचा सहभाग

शहरातून एकूण पाच तरूणींचे गोविंदा पथक या उत्सवात सहभागी होणार आहेत. दरवर्षी हा उत्सव पाहण्यासाठी १० ते १२ हजार जळगावकर नागरिक सहकुटुंब उपस्थित असतात. यंदादेखील मोठ्या प्रमाणात गर्दी होईल व त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले असल्याचे कार्याध्यक्ष प्रितम शिंदे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT